आसाम सरकार (Assam Government) स्वतःचा उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे. आसामचे अर्थमंत्री अजंता निओग यांनी 2025-26 चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. तर आसाम हे स्वतःचे उपग्रह असलेले देशातील पहिले राज्य असेल असा दावा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) यांनी केला.
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाच्या सहकार्याने (ISRO), महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटाचा सतत, विश्वासार्ह प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमचा स्वतःचा उपग्रह ‘Asamsat’ स्थापन करू इच्छितो. यामुळे सीमेवर पाळत ठेवण्यासोबतच महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटा गोळा करण्यात मदत होईल.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, जर आमच्याकडे स्वतःचा उपग्रह असेल तर तो आम्हाला सांगू शकेल की कोणी परदेशी अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुराची आगाऊ माहिती देता येईल. हवामानाशी संबंधित अहवालांमध्ये मदत करण्यास सक्षम असेल. याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच सीमेवरील घुसखोरांवर नजर ठेवता येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Assam Government)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community