![Assault by Principal : प्राचार्यांकडून नऊ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न; केडगावमध्ये खळबळ Assault by Principal : प्राचार्यांकडून नऊ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न; केडगावमध्ये खळबळ](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-71-696x377.webp)
एका प्राचार्याने त्याच्याच शाळेत (School) शिकणाऱ्या नऊ वर्षीय शाळकरी मुलाला स्वतःच्या रूममध्ये बोलावून घेत त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना अहिल्यानगरच्या (Ahilya Nagar) केडगाव (Kedgaon) उपनगरात घडली. अभ्यासाच्या बहाण्याने प्राचार्याने मुलाला बोलावून घेतले. (Assault by Principal)
(हेही वाचा – BMC Budget 2025-26 : मुंबई महापालिकेने वाढीव अर्थसंकल्पातून आजचे मरण पुढे ढकलले!)
या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुधाकर देवरे (रा. तिसरा मजला, आदित्य कॉम्प्लेक्स, ओयासिस शाळेसमोर, उदयनराजेनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव आहे. सध्या हे प्राचार्य फरार आहेत.
काय आहे प्रकरण ?
प्राचार्य देवरे हा त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या पीडित मुलाला वेळोवेळी अभ्यासाच्या बहाण्याने स्वतःच्या रूमवर बोलवायचा. (sexual abuse) अभ्यासाच्या नावाखाली मुलाचा लैंगिक छळ करायचा. याबाबत कोणाला काही सांगितले, तर आईवडिलांना मारून टाकू, अशी धमकी द्यायचा. २४ जानेवारीला व त्यापूर्वी वेळोवेळी हा प्रकार घडला.
पीडित मुलाने घरी सांगितल्यावर पालकांनी थेट पोलिसात धाव घेतली. (Assault by Principal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community