Assembly Election 2024 : लोकसभेनंतर मुंबईत वाढले २ लाख ३७ हजार ७१५ मतदार

280
Assembly Election 2024 : लोकसभेनंतर मुंबईत वाढले २ लाख ३७ हजार ७१५ मतदार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण आणि नवीन मतदारांची नोंदणी करण्याची मोहिम प्रभावीपणे राबवल्यामुळे मुंबईत तब्बल २ लाख ८० हजार मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शहर भागांमध्ये ५३ हजार ३७२ आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात २ लाख ३७ हजार ७१५ मतदारांमध्ये वाढ झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Assembly Election 2024)

विधानसभा निवडणुकीकरता येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून या मतदानासाठी मुंबईत कशाप्रकारे व्यवस्था तसेच तयारी करण्यात आली आहे याची माहिती जिल्हा निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त निर्णय अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, अतिरिक्त निर्णय अधिकारी डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त निर्णय अधिकारी डॉ. अमित सैनी आणि अतिरिक्त निर्णय अधिकारी अभिजित बांगर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजनेची Congress च्या महिला मंत्र्यानेच केली पोलखोल)

लोकसभा निवडणुकीनंतर जुन्या मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करून काही मतदारांची नावे वगळून काहींची नावे समाविष्ट करण्याबरोबरच नवमतदारांची नोंदणी करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीनंतर मतदार नोंदणीच्या राबवलेल्या प्रक्रियेनुसार २ लाख ८० हजार मतदारांची संख्या वाढलेली पहायला मिळाली आहे. (Assembly Election 2024)

मुंबई शहरातील १० आणि उपनगरांतील २६ अशाप्रकारे एकूण ३६ विधानसभा मतदारसंघात तब्बल १ कोटी ०२ लाख २९ हजार ७०८ मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ५४ लाख ६७ हजार ३६१ तर महिला मतदारांची संख्या ४७ लाख ६१ हजार २६५ एवढी आहे. तर तृत्तीयपंथी मतदारांची संख्या १०८२ आणि दिव्यांग मतदारांची संख्या २३ हजार ९२७ तसेच ८५ हजार मतदारांची संख्या १ लाख ४६ हजार ८५९ एवढी असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा मुंबई जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भूषण गगराणी यांनी दिले आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election : मुंबईत निवडणूक प्रचार काळात पकडली ४४ कोटींची रोख रक्कम; २२५ किलोचे ड्रग्ज केले जप्त)

मतदारांची एकूण संख्या : १ कोटी ०२ लाख २९ हजार ७०८

पुरुष मतदारांची संख्या : ५४ लाख ६७ हजार ३६१

महिला मतदारांची संख्या : ४७ लाख ६१ हजार २६५

तृतीयपंथी मतदार : १ हजार ०८२

ओव्हरसीस मतदार : २ हजार २८८

दिव्यांग मतदार : २३ हजार ९२७

८५ वर्षांवरील मतदार : १ लाख ४६,८५९

सर्विस वोटर : १ हजार ४७५

एकूण मतदान केंद्र : १०,११७

क्रिटीकल मतदान केंद्र : ७६

मॉडेल मतदारसंघ : ८४

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.