Assembly Election 2024 : आचारसंहिता भंगाच्या ९१० तक्रारी प्राप्त; ८९९ निकाली

103
Maharashtra Assembly Election : राज्यात ९.७ कोटी मतदार; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या?

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ९१० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : अर्ज दाखल करण्यासाठी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त)

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – National Water Awards : महाराष्ट्रातील विविध संस्थांना पाच राष्ट्रीय जल पुरस्कार)

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.