Assembly Election 2024 : मुंबईत सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

1069
Assembly Election : गर्दी टाळण्यासाठी मुंबईमध्ये असणार १० हजार १११ मतदान केंद्रे

येत्या विधानसभा निवडणूक २०२४ (Assembly Election 2024) च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने, मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.

मुंबईत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या दोन महसूल क्षेत्र येत असून हे दोन जिल्हे मिळून म्हणजेच संपूर्ण मुंबईत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाजाला वेग आला असताना, भारतीय निवडणूक आयोगाने मुंबईतील जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.

(हेही वाचा – मालाडमध्ये नाझिया अन्सारीकडून National Flag चा अवमान; गुन्हा दाखल)

त्याचप्रमाणे आता, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मदतीला एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील चार अतिरिक्त आयुक्त तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी व मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी अशा सहा जणांचा समावेश आहे. या संदर्भातील आदेश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने निर्गमित करण्यात आले आहेत. निवडणूक विषयक कामकाज सुनियोजित आणि सुलभ व्हावे, तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राहावे, या दृष्टीने या सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. (Assembly Election 2024)

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी

(विद्यमान जिल्हाधिकारी – संजय यादव)

लोकसभा मतदार संघ – दक्षिण मुंबई

विधानसभा मतदारसंघ – वरळी (१८२), शिवडी (१८३ ), भायखळा (१८४), मलबार हिल (१८५), मुंबादेवी (१८६), कुलाबा (१८७)

(हेही वाचा – Zero Prescription Scheme च्या निविदा प्रक्रियेला बांगर निघाले गती द्यायला)

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी)

लोकसभा मतदार संघ – दक्षिण मध्य मुंबई

विधानसभा मतदारसंघ :- धारावी (१७८), शीव कोळीवाडा (१७९), वडाळा (१८०), माहीम (१८१)

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी)

लोकसभा मतदारसंघ – दक्षिण मध्य मुंबई

विधानसभा मतदारसंघ – अणुशक्ती नगर (१७२), चेंबूर (१७३)

लोकसभा मतदारसंघ – मुंबई उत्तर पूर्व

विधानसभा मतदारसंघ : मुलुंड (१५५), विक्रोळी (१५६), भांडूप पश्चिम (१५७), घाटकोपर पश्चिम (१६९), घाटकोपर पूर्व (१७०), मानखुर्द शिवाजी नगर (१७१)

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी

(विद्यमान जिल्हाधिकारी – राजेंद्र क्षीरसागर)

लोकसभा मतदारसंघ- उत्तर मध्य मुंबई

विधानसभा मतदारसंघ :- विलेपार्ले (१६७), चांदिवली (१६८), कुर्ला (१७४), कलिना (१७५), वांद्रे पूर्व (१७६), वांद्रे पश्चिम (१७७)

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)

(लोकसभा मतदारसंघ – उत्तर पश्चिम मुंबई)

विधानसभा मतदारसंघ:- जोगेश्वरी (१५८), दिंडोशी (१५९), गोरेगाव (१६३), वेसावे (वर्सोवा) (१६४), अंधेरी पश्चिम (१६५), अंधेरी पूर्व (१६६)

(हेही वाचा – ९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे; Surajya Abhiyan ची मागणी)

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)

(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर)

लोकसभा मतदारसंघ – उत्तर मुंबई

विधानसभा मतदारसंघ : बोरिवली (१५२), दहिसर (१५३), मागाठाणे (१५४), कांदिवली पूर्व (१६०), चारकोप (१६१), मालाड पश्चिम (१६२) (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.