Assembly Election 2024 : ५०२ कोटींची मालमत्ता जप्त; निवडणूक यंत्रणेची कारवाई

74
Assembly Election 2024 : ५०२ कोटींची मालमत्ता जप्त; निवडणूक यंत्रणेची कारवाई
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (Assembly Election 2024)

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ५ हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ५ हजार २३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – महायुतीचे उमेदवार Mihir Kotecha यांच्या जीवाला धोका; निवडणूक आयोगाने घेतली दखल)

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. (Assembly Election 2024)

ठाण्यात २१ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यात अंजूरगाव आणि आलीमघर खाडीमध्ये हातभट्टी केंद्रावर ११ नोव्हेंबर रोजी सामूहिक धाडसत्र मोहिम राबवून एकूण सात गुन्हे नोंदविले आहे. या कारवाईत २०० लीटर क्षमतेच्या ३५४ ड्रम्स, एक हजार लीटर क्षमतेचे तीन बॉयलर आणि अन्य हातभट्टी साहित्याचा मुद्देमाल जप्त केला. सदर माल हा नाशवंत असल्यामुळे जागेवरच नष्ट करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत २० लाख ७५ हजार रुपये इतकी आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.