विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार 148 ठाणे विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहेत. या मतदारांसाठी संबंधितांच्या घरी जावून मतदान घेण्यात येणार आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Assembly Election : हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात मत विभाजनाची भीती; अपक्षांनी केली डोकेदुखी)
याकरिता 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची आपआपल्या कार्यक्षेत्रातील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांनी नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील 5 हजार 302 मतदार आहेत तर 3 हजार 173 दिव्यांग मतदार आहेत. तरी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील ज्या 85 वर्षांवरील व दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंद केली आहे, त्यांनी याची नोंद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन स्वीप पथकाकडून करण्यात येत आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community