Assembly Election 2024 : मतदार बनलेल्या घुसखोरांवर निवडणूक आयोगाची करडी नजर

30
Assembly Election 2024 : मतदार बनलेल्या घुसखोरांवर निवडणूक आयोगाची करडी नजर
  • प्रतिनिधी

राज्यभरात विविध मतदारसंघांमध्ये नवीन नाव नोंदणी करत असताना अनेकांनी बोगस आधार कार्ड व मतदान ओळखपत्र बनवून ऑनलाईन मतदार नोंदणी करून पुरवणी यादीमध्ये नावे समाविष्ट करून घेतली आहेत. याबाबत काही मतदारसंघांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बोगस नावे मतदान यादीत नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बोगस नावासंदर्भात विविध संघटनांच्या प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – भाजपा नेते Vinod Tawde यांनी फेटाळले पैसे वाटल्याचे आरोप; म्हणाले, ४० वर्ष राजकारणात पण…)

मतदान दिवशी केंद्रावर असे बोगस मतदान करताना सापडल्यास त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते अशा बोगस नावाचा मतदारांचा शोध घेत आहेत. निवडणुका या लोकशाहीच्या आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत झाल्या पाहिजेत. आचारसंहितेला कुठे गालबोट न लावता शांततेत झाल्या पाहिजेत. बोगस नावे नोंद करून अगोदरच गुन्हा केलेला आहे, परंतु मतदान करताना पुन्हा एकदा गुन्हा केल्यास त्याच क्षणी सदर व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Umpire Hit With The Ball : फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह जेव्हा पंचांच्या डोळ्यावर बसतो…)

बुधवार २० नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांमध्ये एकाचवेळी विधानसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादीत काही अल्पवयीन मुलं, मुली यांचे बोगस वयाचे पुरावे सादर करून समाविष्ट केलेली नावे निदर्शनास आल्यास पुरावे तपासावे. कोणी बोगस मतदान करताना सापडला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार आहे. मतदारसंघातील बूथ वरील सर्व निवडणूक प्रतिनिधींना नम्र विनंती आहे की अशा प्रकारचे बोगस मतदान होत असताना आपल्या निदर्शनास आले तर आपण त्यावरती आपला आक्षेप नोंदवावा आणि तेथील मतदान केंद्राचे केंद्राध्यक्षांना सदर व्यक्तीच्या वयाबाबतचा पुरावा तपासून त्यावरती फौजदारी कारवाई करावी, असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.