Assembly Election 2024 : वेगवेगळे मतदान कार्ड असतील तर होऊ शकतो कारावास

112
Assembly Election 2024 : वेगवेगळे मतदान कार्ड असतील तर होऊ शकतो कारावास

निवडणुकीत मतदानासाठी निवडणूक आयोगाने १२ प्रकारची ओळखपत्र ग्राह्य धरली आहेत. यात मतदान कार्डाचाही समावेश आहे. मतदानदिनी मतदार ओळखपत्र अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानले जाते. अन्य ओळखपत्र नव्हते तेव्हा मतदार ओळखपत्र हाच एकमेव ओळखीचा पुरावा होता. मात्र, आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत, असे असले तरी दोन वेगवेगळी मतदार कार्ड असणे कायद्याने गुन्हा आहे. अशावेळी कारावासही भोगावा लागू शकतो. (Assembly Election 2024)

मतदार ओळखपत्र हा एक आवश्यक शासकीय दस्तऐवज आहे. नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी ओळखपत्र अनिवार्य आहे. पण, दोन किंवा त्यापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र बाळगल्यास कारावास भोगावा लागू शकतो. मतदारयादीत एकापेक्षा जास्त वेळी मतदार म्हणून नोंदणी करणे, हासुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे मतदारांनी निवडणूक ओळखपत्र तयार करताना खबरदारी व काळजी घेणे महत्त्वाचे मी आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची ना आचारसंहिता सुरु आहे. मतदान कार्डाविषयी काही फ्रॉड आढळल्यास निवडणूक आयोगाकडून कठोरात कठोर शिक्षेचे प्रावधान आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही; Ramesh Chennithala यांचा मित्रपक्षांना इशारा)

…तर यादीतील नाव कसे वगळावे?

एका व्यक्तीकडे दोनपेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्यास हे रद्द करण्यासाठी फॉर्म क्र. ७ भरावे लागते. ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येते. सर्व माहिती योग्य भरल्यास काही काळ प्रतीक्षा करावी लागते. या प्रक्रियेसाठी अधिकची माहिती निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घेता येते. याशिवाय बीएलओ पूर्ण सहकार्य करू शकतात. यासाठी निवडणुकीपूर्वी संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जातो. यावेळी ही दुरुस्ती केली जाऊ शकते. (Assembly Election 2024)

नको असलेले मतदार कार्ड रद्द करण्यासाठी तालुका मुख्यालयाच्या निवडणूक विभागात जाऊन ऑफलाइन अर्ज सादर करता येतो. अर्ज केल्यानंतर नको असलेले मतदार कार्ड रद्द करता येते. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.