Assembly Election 2024 : मतदार यादीत मतदारांनी कुठे जाऊन नाव तपासून घ्यावे, जाणून घ्या!

69
Assembly Election 2024 : मतदार यादीत मतदारांनी कुठे जाऊन नाव तपासून घ्यावे, जाणून घ्या!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील दहा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी मतदार यादीत आपले नाव, मतदान केंद्र तपासून घ्यावे. मतदारांच्या माहितीसाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरुन मतदार यादीतील नावासंदर्भात माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी मतदार मदत क्रमांक 02220822781 किंवा 1950 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : ५५२ उमेदवारांचे अर्ज दाखल)

अंतिम मतदार यादी लवकरच प्रकाशित केली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने नवमतदार नोंदणीची दिलेली उदिष्ट्येपूर्तीसाठी विशेष जनजागृती मोहिम राबवून अधिकाअधिक नवमतदार नोंदणी करुन घेण्यात आली आहे. या मतदार नोंदणी अभियानात १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी आपले नाव मतदार यादीत नोंद करुन मतदानाचे हक्कदार होण्याबाबत आवाहन करण्यात आले. या आवाहनाला नवमतदारांनी प्रतिसाद देत सुमारे ३८,३२५ नवमतदारांनी मतदार नोंदणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा स्तरावर निवडणुकीच्या कामकाजासाठी समन्वयक अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून निवडणूक विषयक कामांना प्राधान्य देण्यात येत असून क्षेत्रीय अधिकारी, पोलीस क्षेत्रीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी स्तरावर निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कामाचे नियोजन करण्यात येत आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Congress Candidate list : काँग्रेसची पहिली यादी जाहीर; नाना पटोलेसह ‘ही’ ज्येष्ठ नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात)

मुंबई शहर जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततामय, मुक्त, नि:पक्ष, सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, धारावी – मतदार नोंदणी अधिकारी यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारावीसह अनेक मतदान केद्रांना भेटी देऊन कामकाज आढावा घेऊन चोख व्यवस्थापन व नियोजन करावे असे सांगून वरील वयोगटातील नोंदणी न झालेल्या मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना दिल्या. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीविषयी भारत निवडणूक आयोगामार्फत वेळोवेळी आलेल्या सूचनांचे पालन करण्यात येत आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.