- प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर केलेल्या कारवाईत ४० कोटी ४० लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात ९ हजार ९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात ८,६१७ जणांना अटक करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ही कारवाई दुपटीने वाढल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त (अंमलबजावणी आणि दक्षता) प्रसाद सुर्वे यांनी दिली. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Konkan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेब्लॉकमुळे ‘या’ गाड्या रखडणार)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण राज्यभरात बेकायदेशीर मद्यविक्री, मद्यतस्करी तसेच गावठी दारू (हातभट्टी) विक्री करणाऱ्यांवर मागील महिनाभरात केलेल्या कारवाईत राज्यात ४० कोटी ४० लाख रुपयांचे बेकायदेशीर मद्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील प्रमुख शहरामध्ये तसेच ग्रामीणमध्ये बेकायदेशीर मद्यविक्री आणि तस्करी प्रकरणी ९ हजार ९१ गुन्हे दाखल केले असून या प्रकरणी ८,६१७ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त (अंमलबजावणी आणि दक्षता) प्रसाद सुर्वे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : आचारसंहिता कालावधीत ५३२ एफआयआर; सिंधुदुर्गात मात्र एकही गुन्हा नाही)
या संपूर्ण कारवाईत ५७ हजार लिटर विदेशी मद्य, २७ हजार देशी मद्य, ९० हजार गावठी मद्य (हातभट्टी), तसेच गोवा दमन येथून राज्यात तस्करी करण्यात आलेला ४१ हजार ९२७ लिटर मद्यसाठा आणि १ हजार १५३ मद्य तस्करीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती सुर्वे यांनी दिली आहे. राज्यभरात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले मद्याची किंमत ४० कोटी ४० लाख रुपये असल्याचे सुर्वे म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईच्या तुलनेत ही कारवाई दुपटीने करण्यात आली असून सर्वात अधिक मद्यसाठा पुणे, नाशिक, ठाणे जिल्ह्यात जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात राज्यभरात ३ हजार ७४२ अधिकारी आणि कर्मचारी एवढे मनुष्यबळ आहे, त्यापैकी राज्यभरात ३ हजार १०० अधिकारी आणि कर्मचारी राज्यभरात फिल्डवर काम करीत आहे. सर्वाधिक मनुष्यबळ पुणे आणि नाशिक जिल्ह्यात असल्यामुळे कारवाईचे प्रमाण या दोन जिल्ह्यात अधिक असल्याचे प्रसाद सुर्वे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना सांगितले. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community