- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई उपनगर जिल्हांतर्गत विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात सुरू असून महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास तात्काळ हजर राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले आहेत. तसेच गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. (Assembly Election 2024)
मतदान केंद्र अध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, व इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण यावेळी झाले. यावेळी हॅण्डस ऑन ट्रेनिंगची देखील व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – पश्चिम द्रुतगती महामार्गावरील Andheri Bridge चा वाद न्यायालयात, तरीही महापालिकेच्यावतीने दुरुस्ती!)
प्रशिक्षणास तात्काळ हजर रहावे
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास तात्काळ हजर राहण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले आहेत. (Assembly Election 2024)
गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले त्यांची माहिती संकलित करण्यात येत असून गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Mahayuti तील उमेदवारांची पहिली यादी पुढील आठवड्यात)
नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे बंधनकारक….
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक २०२४ साठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community