राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचारसभा आता अंतिम टप्यात आल्या आहेत. २८८ मतदार संघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुण्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे साडे तीन हजार पोलिसांचा (Police) फौजफाटा तैनात राहणार आहे. (Assembly Election 2024)
मतदान प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पिंपरी – चिंचवड पोलिस (Pimpri – Chinchwad Police) आयुक्तालयाच्या अखत्यारीत पिंपरी, चिंचवड, भोसरी हे तीन मतदारसंघ तर खेड, खडकवासला, मुळशी, मावळ या मतदारसंघाचा काही भाग येतो. सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रांच्या सुरक्षेबाबतचा आढावा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (CP Vinay Kumar Chaubey) यांनी घेतला आहे. बुथवर तसेच बुथबाहेर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत.
मतदान यंत्रांसाठी पथके
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्रामधून मतमोजणी केंद्रापर्यंत मतदान यंत्रे सुरक्षित पोहचणे आवश्यक आहे. त्यासाठी देखील पोलिसांची विशेष पथके सज्ज करण्यात आली आहेत. तसेच मतदान केंद्र (polling station) परिसरात गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हे शाखेकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. साध्या वेशातील पोलिस देखील ‘वाॅच’ ठेवणार आहेत.
(हेही वाचा – गोध्रा हत्याकांडावर आधारित ‘The Sabarmati Report’ चित्रपट; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक)
असा असेल पोलिस बंदोबस्त
अधिकारी : २५०
अंमलदार : ३५००
होमगार्ड : १०००
केंद्रीय राखीव दल : सहा तुकड्या
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community