Assembly Election 2024 : मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर; राज्य शासनाकडून परिपत्रक जारी

132

राज्यात विधानसभा निवडणुकींच्या (Assembly Election 2024) मतदानासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तर राज्यभर प्रचारसंभाचा जोर शिगेला पोहोचला आहे. १८ नोव्हेंबर रोजी प्रचारसभांच्या तोफा थंडावणार आहेत. दरम्यान, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी (Holiday) जाहीर करण्यात आली असून, राज्य सरकारकडून परिपरत्रक जारी करण्यात आले आहे. (Assembly Election 2024)

राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगही जोमाने कामाला लागले असून भरारी पथके, स्थिर पथके, पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करताना दिसत आहे. विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगानेही यापूर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा (Voting) टक्का वाढावा यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी (public holiday) देण्यात येत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर आता राज्य सरकारकडून परिपरत्रक जारी करत २० नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

(हेही वाचा – गुरुवारी PM Narendra Modi मुंबईत घेणार सभा, ‘या’ मार्गांच्या वाहतुकीत होणार बदल)

काय लिहिले परिपत्रकात ?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान दिनी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर झाली आहे. त्यानुसार, क्रमांक सार्वसु-१०२४/१२६ (२९) लेखअधिनियम, १८८९ (१८८९चा २६) च्या कलम २५ नुसार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८ जेयुडीएल तीन दिनांक ८ मे १९६८ अन्यये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघानिक सुट्टी करीत आहे, असे परिपत्रकच राज्य शासनाच्यावतीने काढण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.