Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या ४१२ उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

32
Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या ४१२ उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद
  • प्रतिनिधी 

विधानसभा २०२४ निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राज्यभरातील उमेदवारांपैकी ४१२ उमेदवारावर हत्या आणि लैंगिक अत्याचार सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच (एमईडब्ल्यू) यांच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मतदार बनलेल्या घुसखोरांवर निवडणूक आयोगाची करडी नजर)

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच (एमईडब्ल्यू) यांच्या सर्वेक्षणात राजकीय पक्षाच्या उमेदवारांपैकी ६२९ (२९%) उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ४१२ (१९%) यांच्यावर लैंगिक अत्याचार, खून यासह गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. हे सर्वेक्षण रिंगणात असलेल्या एकूण ४,१३६ उमेदवारांपैकी २,२०१ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांवर आधारित होते (यामध्ये अपक्षांचा विचार केला गेला नाही). (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election : मतदारांना लुटणार्‍या ‘खाजगी ट्रॅव्हल्स’वर कठोर कारवाई करावी; सुराज्य अभियानची मागणी)

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, प्रमुख पक्षांकडे गुन्हेगारी नोंदी असलेले बहुसंख्य उमेदवार आहेत. सर्वेक्षण विधानसभेच्या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी १ हजार ३४ उमेदवारानी त्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता ५ आणि इयत्ता १२ वी असल्याचे घोषित केले आहे. या वर्षीच्या निवडणुकीत संपत्ती हा महत्त्वाचा घटक राहिला आहे. विश्लेषित उमेदवारांपैकी ८२९ उमेदवारांची १ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे. प्रमुख पक्षांमध्ये करोडपती उमेदवारांचे प्रमाण आश्चर्यकारक आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.