नेत्यांचे फोटो मॉर्फिंग करून अनेकजण सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्यांच्यावर त्या त्यावेळी कारवाई होतेच, पण आता विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) अनुषंगाने अशा बाबींवर सायबर पोलिसांचा कटाक्ष आहे. तसे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांसह ते तयार करणाऱ्यास पाच लाख रुपयांचा दंड व तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे ग्रुप ॲडमिनने अशा बाबींकडे आवर्जून लक्ष देणे अपेक्षित असल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; जप्त केले ५५८ कोटी रुपये)
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) अनुषंगाने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ, फोटोंवर लक्ष ठेवण्यासाठी सोलापूर शहर सायबर पोलिसांनी एक हवालदार व चार अंमलदारांची टीम नेमली आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, शेअरचॅट अशा ठिकाणी कोणी मूळ फोटो किंवा व्हिडिओमध्ये जाणूनबुजून छेडछाड केली व समोरच्याला त्यात छेडछाड झाल्याची माहिती असतानाही तो व्हिडिओ किंवा फोटो तसाच पुढे व्हायरल (प्रसारित) केल्यास दोघांनाही तेवढीच शिक्षा होईल, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community