महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ पार्श्वभूमीवर, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तभ भूषण गगराणी यांचे समवेत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात वेबकास्टिंग संनियंत्रण कक्षास भेट देऊन मतदान केंद्रातील प्रक्रियेचा आढावा घेतला. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी निश्चित किमान सुविधा (Assured Minimum Facilities), रांगेमध्ये ठराविक ठिकाणी आसन व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, मेडिकल किट आदींबाबत गगराणींनी संबंधितांना निर्देश दिले. तर कायदा-सुव्यववस्थेत बाधा आणणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असे फणसळकर यांनी स्पष्ट केले. (Assembly Election)
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत मुंबईत एकूण १० हजार ११७ मतदार केंद्रांमध्ये मतदान होत आहे. यापैकी शहर भागात २ हजार ५३८ तर उपनगर भागात ७ हजार ५७९ मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून एकूण सुमारे ३० हजार पोलिस कार्यरत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्यासमवेत मुंबई पोलीस आयुक्तक विवेक फणसळकर यांनी वेबकास्टिंग संनियंत्रण कक्षातून ३६ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला, तसेच आवश्यक ते निर्देश दिले. (Assembly Election)
मुंबईतील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रशासनाची नजर, स्वत: पालिका आयुक्त भूषण गगराणींनी कंट्रोल रुमला भेट देऊन केली पाहणी.
.#electioncommision #maharashtra #assemblyelections #politics #MaharashtraElection2024 pic.twitter.com/09O5cJ6EJL— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) November 20, 2024
(हेही वाचा – Deepfake Video : RBI Governor Shaktikanta Das यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल!)
विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग कॅमेरे बसवण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, नियोजनपूर्ण व्हावी आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वेबकास्टिंगद्वारे विशेष काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रांवर मतदान सुरू होण्यापूर्वीपासून ते मतदान संपेपर्यंतच्या सर्व घडामोडींचे चित्रिकरण केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही मतदान केंद्रावरील कोणत्याही क्षणाची दृश्ये पाहता येणे शक्य आहे. (Assembly Election)
माननीय भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना वेबकास्टिंगची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर बारकाईने नजर ठेवता येणे शक्य आहे. भूषण गगराणी म्हणाले की, मतदान केंद्रांवर मूलभूत सोयी-सुविधांची पूर्तता, चोख सुरक्षाव्यवस्था आणि पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही सर्व नागरी सोयीसुविधा आणि उपाययोजनांच्या अनुषंगाने या प्रक्रियेत कार्यरत आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनाने उत्तम आणि चोख व्यवस्था केली आहे. दिव्यांग मतदारांना सुलभ पद्धतीने मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या वेबकास्टिंग संनियंत्रण कक्षाद्वारे संपूर्ण मतदान केंद्रांवर निगराणी ठेवली जात आहे, असेदेखील गगराणी यांनी नमूद केले. मुंबई पोलिस आयुक्त फणसळकर म्हरणाले की, मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा भागात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी म्हणून मुंबई पोलिस सजग आहेत. आवश्यक तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा येणार नाही, याची पोलीस काळजी घेत आहेत, असे फणसळकर यांनी नमूद केले. (Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community