Assembly Election : मतदान केंद्र परिसरात स्वच्छता, पाणी आणि शौचालयांच्या सुविधेसाठी महापालिकेचा पैसा

74
Assembly Election : मतदान केंद्र परिसरात स्वच्छता, पाणी आणि शौचालयांच्या सुविधेसाठी महापालिकेचा पैसा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) निवडणूक आयोगाकडून खर्च केला जात असला तरी आता महापालिकेच्या तिजोरीतूनही यावर खर्च केला जात असून मतदान केंद्राच्या ५० मीटर परिसराची स्वच्छता, मतदान केंद्रात पाणी व्यवस्था व इतर कामांसाठी प्रत्येक प्रशासकीय विभागात प्रत्येकी २० लाख याप्रमाणे ४ कोटी ८० लाख रुपये खर्च केला जात आहे.

(हेही वाचा – Ranji Trophy 2024 : रणजी करंडकात एकाच दिवशी संघातील दोघांची त्रिशतकं! गोव्याच्या खेळाडूंची धावांची लूट)

विधानसभेची निवडणूक (Assembly Election) येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान केंद्राच्या ५० मीटर परिसरात स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे तसेच प्रत्यक्ष निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी, नंतर व निवडणूकीच्या दिवशी मतदान केंद्रामधील शौचालयांची स्वच्छता राखणे या कामाकरिता महापालिकेच्यावतीने निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांसाठी विभागीय स्तरावर प्रत्येकी २० लाख एवढा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. निवडणूक काळात मतदान केंद्र व आसपासचा परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित सहाय्यक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांची राहील. त्यामुळे यासर्व कामांसाठी महापालिकेच्या तिजोरीतून सुमारे ४ कोटी ८० लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

(हेही वाचा – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’; Hindu Janajagruti Samiti चा उपक्रम)

आतापर्यंत निवडणूक कामांसाठी जिल्हाधिकारी स्तरावर निवडणूक अधिकाऱ्यांकडून खर्च केला जात असे. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपवल्याने निवडणूक आयोगाच्यावतीने खर्च केला असला तरी पर्यायी व्यवस्था म्हणून हा अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. स्वच्छतेची कामे ही महापालिकेच्यावतीने केली जात असली तरी निवडणूक कामांसाठी महापालिकेचे कामगार नियुक्त केल्या आहेत. त्यामुळे खासगी मनुष्यबळ घेऊन ही स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केल्याची माहिती मिळत आहे. तसेच पिण्याची पाण्याची व्यवस्था ही निवडणूक आयोगाकडून केली जात असली तरी जर हे पाणी उपलब्ध झाले नसेल तर या निधीतून हे पाणी उपलब्ध करून देणे तसेच जे मतदान केंद्रातील स्वयंसेवकांना भोजनाची व्यवस्थाही याच खर्चातून केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, महापालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या खर्चाची रक्कम निवडणूक आयोग महापालिकेला देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.