Assembly Election : आताही नवीन मतदार नोंदणी करता येईल का? सविस्तर माहिती एका क्लिकवर

143
Assembly Election 2024 : मतदार यादीत मतदारांनी कुठे जाऊन नाव तपासून घ्यावे, जाणून घ्या!

विधानसभा निवडणूक (Assembly Election) येत्या नोव्हेंबर महिन्यात घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात (288 assembly constituencies) एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. ज्यांनी नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही. त्यांना अजूनही १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी आहे. (Assembly Election)

या निवडणुकीआधी मतदारांनी (Voting list) स्वत:चं नाव आर्वजून मतदार यादीत समाविष्ट झाल्याची खात्री करावी. तसेच ज्यांनी नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही, त्यांनी तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत नाव मतदार यादीत नोंदवावे. जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम (Chief Electoral Officer S. Chokkalingam) यांनी केले. ज्यांनी नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही, त्यांना १९ ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे. तर निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. (Assembly Election)

 

(हेही वाचा – Maharashtra Assembly election मध्ये वांद्रे पूर्वेत झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात होणार लढत)

तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत (Electoral Roll) आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे. (Assembly Election)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.