Assembly Election : मुंबईत निवडणूक प्रचार काळात पकडली ४४ कोटींची रोख रक्कम; २२५ किलोचे ड्रग्ज केले जप्त

456
Assembly Election : मुंबईत निवडणूक प्रचार काळात पकडली ४४ कोटींची रोख रक्कम; २२५ किलोचे ड्रग्ज केले जप्त
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

निवडणूक काळात मतदारांना होणाऱ्या पैशांच्या वाटपावर निर्बंध आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने दक्षता पथक नियुक्त करण्यात आली आहेत. त्यानुसार दक्षता पथकाच्या तपासणीमध्ये अनेक ठिकाणी रोख रक्कम, मद्य, ड्रग्ज तसेच मौल्यवान वस्तू अशाप्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये शहर आणि उपनगरांमध्ये तब्बल ४४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि तब्बल ५० कोटी रुपयांचे २२५ किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. (Assembly Election)

विधानसभा निवडणुकीचे मतदान येत्या २० नोव्हेंबरला होत असून या मतदानाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा मुंबईचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषदेत मतदानाच्या तयारीसंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यामध्ये गगराणी यांनी निवडणुकीसंदर्भात मुंबईतील विविध ठिकाणी तैनात केलेल्या भरारी पथकाने केलल्या तपासणीमध्ये शहर भागांत ३२ कोटी ९७ लाख ४ हजार एवढी तर उपनगरांमध्ये १२ कोटी ६० लाख ५६ हजार रुपये अशाप्रकारे ४५ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती दिली. जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेसह मौल्यवान धातुंसंदर्भातील माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील कार्यवाही त्यांच्या मार्फत केली जाणार असल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले. (Assembly Election)

(हेही वाचा – राहुल गांधींना धारावी प्रकल्प शेखला द्यायची इच्छा; Vinod Tawde यांचा घणाघात)

तब्बल ४१ हजार लिटरचा मद्यसाठा जप्त

मुंबई शहरांत १२ लाख ८९ हजार रुपये किमतीची २८०० लिटर आणि १ कोटी १० लाख ७७ हजार रुपयांचे ३९,३८५ लिटर रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. (Assembly Election)

तब्बल २२५ किलोचे ड्रग्ज जप्त

शहर भागात तब्बल २७ किलो १२१ ग्रॅमचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. ज्याची किंमत ४ कोटी १७ लाख ५१ हजार रुपये एवढी असून उपनगरांमध्ये ४४ काटी ७९ लाख १० हजार रुपये किमतीचे १९७ किलो ३१२ ग्रॅम ड्रग्जचा साठा जप्त भरारी पथकाने विविध ठिकाणी तपासणी करून जप्त करण्यात आला. (Assembly Election)

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy 2024 : पर्थमध्ये कसं आहे हवामान? पावसाची शक्यता किती?)

तब्बल २४४ कोटी रुपयांचे मौल्यूवान धातू

सोने, चांदी अशाप्रकारे संपूर्ण मुंबईमध्ये तब्बल २४४ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आले. यामध्ये शहर भागात ६ कोटी ९७ लाख ७० हजार रुपये आणि उपनगर भागातील २३८ कोटी ६७ लाख ८ हजार किंमतीचे दागिने तसेच सोने, चांदीसह इतर धातूच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.