Assembly Election : प्रत्येक मतदान केंद्रावर निश्चित किमान सुविधा; ‘स्वीप’ उपक्रमाच्या अंमलबजावणीचा वेग वाढवण्याचे निर्देश

34
Assembly Election : प्रत्येक मतदान केंद्रावर निश्चित किमान सुविधा; 'स्वीप’ उपक्रमाच्या अंमलबजावणीचा वेग वाढवण्याचे निर्देश
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ (Assembly Election) मध्ये मुंबई पश्चिम उपनगर जिल्‍ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर निश्चित किमान सुविधा (Assured Minimum Facilities) योग्य प्रकारे पुरविल्या जाव्यात. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दिव्‍यांगांसाठी व्हिल चेअर, प्रतिक्षालय आणि रांगेतील व्‍यक्‍तींसाठी आसन व्‍यवस्‍था यांसारख्या मुलभूत सोयी सुविधा विनासायास उपलब्‍ध कराव्‍यात. निश्चित किमान सुविधा पुरविण्‍याकामी कोणतीही कसूर ठेवू नये, असे निर्देश अतिरिक्‍त जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. समाजातील सर्व स्तरांमध्ये पोहोचून मतदान करण्याबाबतची जनजागृती होईल, यादृष्टिने उपक्रमांची संख्या वाढवावी. ‘स्वीप’ उपक्रमाच्या अंमजबजावणीचा वेग वाढवावा, असे निर्देशही डॉ. शर्मा यांनी दिले आहेत.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ (Assembly Election) च्‍या अनुषंगाने अंधेरी (पूर्व), अंधेरी (पश्चिम), वेसावे (वर्सोवा), जोगेश्‍वरी (पूर्व), गोरेगाव आणि दिंडोशी या सहा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामांची आढावा बैठक गुरुवारी ०७ नोव्‍हेंबर २०२४ रोजी पार पडली. त्‍यावेळी विपिन शर्मा यांनी हे निर्देश दिले. विलेपार्ले (पूर्व) येथील मास्‍टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे पार पडलेल्‍या या बैठकीस महानगरपालिकेचे सहआयुक्‍त (परिमंडळ ४) विश्‍वास शंकरवार, उप आयुक्‍त (परिमंडळ ३) विश्‍वास मोटे, उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) किरण दिघावकर, सहायक आयुक्‍त (के पूर्व विभाग) मनीष वळंजू, सहायक आयुक्‍त (के पश्चिम) चक्रपणी अल्‍ले, सहायक आयुक्‍त (पी दक्षिण विभाग) संजय जाधव आदींसह सर्व क्षेत्रीय अधिकारी व निवडणूक संबंधित अधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

(हेही वाचा – Baba Siddique यांच्या हत्येसाठी झारखंड राज्यात करण्यात आला होता गोळीबाराचा सराव)

प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी

अतिरिक्‍त जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा म्‍हणाले, प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा पुरविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्‍या अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास त्याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे व वैद्यकीय सुविधा आदी निश्चित किमान सुविधा पुरविण्यात याव्‍यात. (Assembly Election)

(हेही वाचा – BMC : महापालिका विधी खात्याची आयुक्तांनी ऐकून घेतली बाजू, दिले ‘हे’ निर्देश)

घरोघरी जाऊन मतदारांचे प्रबोधन

मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी सुरु असलेल्या विविध जनजागृती उपक्रमांचा आढावा घेताना डॉ. शर्मा म्‍हणाले की, ज्‍या ठिकाणी मतदान कमी झाले आहे, त्‍या ठिकाणी मतदारांच्‍या घरोघरी जाऊन मतदारांचे प्रबोधन करावे. त्‍यांना मतदान करण्‍याकामी प्रोत्‍साहीत करावे. मतदान जनजागृतीसाठी विविध प्रसार माध्‍यमे, समाज माध्‍यमांचा अधिकाधिक अवलंब करावा. (Assembly Election)

‘स्वीप’ उपक्रमाच्या अंमजबजावणीचा वेग 

सार्वजनिक ठिकाणांवर फलक (होर्डिंग्ज्), बॅनर, भित्तीपत्रके प्रदर्शित करणे, विविध शासकीय कार्यालयांमध्ये बॅनर, भित्तीपत्रके, स्टॅण्डीज प्रदर्शित करणे, बेस्ट बसगाड्या व बस थांब्यांवर प्रसिद्धी करावी. मोठ्या मंडई तसेच व्यापारी संकूल, महत्त्वाची व पर्यटकांचा अधिक वावर असलेली ठिकाणे इत्यादी जागी पथनाट्य व फ्लॅश मॉब सादर करावेत. खासगी कंपन्या, कॉर्पोरेट क्षेत्र, असंघटीत क्षेत्रातील कामगार अशा वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्‍य नियोजन करावे. ‘स्वीप’ उपक्रमाच्या अंमजबजावणीचा वेग वाढवावा, असे निर्देशही डॉ. शर्मा यांनी दिले. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.