महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचे (Assembly election) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने या महानिवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार याची मोठी उत्सुकता आहे. राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांच्याही मनात निवडणुकीच्या तारखांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबरला हरियाणा व जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल लागणार आहे. तर १० ऑक्टोबरला हरियाणा-जम्मू काश्मीर निवडणूक (Haryana-Jammu Kashmir Election) कार्यक्रम संपणार आहे. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला तयारी करावी लागेल. १३ ऑक्टोबरला रविवार आहे. १४ तारखेनंतर सुरु होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा –Grant Road परिसरातील गृहसंकुलात इमारतीचा स्लॅब कोसळला; एकजण गंभीर जखमी )
महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे गरजेचे आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४५ दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरला १३ ते १६ या तारखांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल.
Join Our WhatsApp Community