Assembly Election Result 2024 : स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलिस तैनात

65
Assembly Election Result 2024 : स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलिस तैनात
  • प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. अंदाजे २ हजार ७०० कर्मचारी मुंबईतील ३६ मतदारसंघातील प्रक्रियेवर देखरेख करतील. एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन ३६ स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे संग्रहित केल्या आहेत, या सर्व सीसीटीव्ही देखरेखीखाली ठेवण्यात आल्या आहे. (Assembly Election Result 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: विजयी आमदार सांभाळण्याचे मविआसमोर आव्हान !)

या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी सुमारे १० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, या सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मुंबई पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य राखीव पोलिस दल नियुक्त करण्यात आले आहे. असे अधिकाऱ्याने सांगितले. मतमोजणी प्रक्रियेवर प्रत्येक मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिसरचे पर्यवेक्षण असेल. एक पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म-निरीक्षक सहाय्यक यांचा समावेश असलेली एक टीम मोजणीचे व्यवस्थापन करेल. (Assembly Election Result 2024)

(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये झालेल्या चकमकीत १० नक्षली ठार; अनेक शस्त्र जप्त)

सकाळी ८ वाजता पोस्टल मतांसह मतमोजणी सुरू होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. मनपाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात १० विधानसभा मतदारसंघात ५२.५६ टक्के मतदान झाले, तर मुंबई उपनगरातील २६ मतदारसंघांमध्ये ५६.३९ टक्के मतदान झाले. मुंबई शहरात एकूण २५.४३ लाख नोंदणीकृत मतदारांपैकी १३.३९ लाखांनी मतदान केले. यामध्ये ७.१० लाख पुरुष आणि ६.२८ लाख महिला मतदारांचा समावेश आहे. तर मुंबई उपनगरात ७६.८६ लाख नोंदणीकृत मतदारांपैकी ४३.३४ लाख लोकांनी मतदान केले, ज्यात २३ लाख पुरुष आणि २०.३४ लाख महिला मतदार आहेत. (Assembly Election Result 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.