Assembly Election : ‘सक्षम ॲप’ ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान

79
Assembly Election : 'सक्षम ॲप' ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान

आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये “सक्षम ECI” ॲप डाऊनलोड करून लाभ घेता येणार आहे. दिव्यांग (PWDs) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेल्या सक्षम ॲपवर विविध सुविधा दिल्या आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम दिव्यांग मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये सक्षम ॲप डाऊनलोड करून घ्यावे.

(हेही वाचा – PM Modi आचारसंहिता संपताच देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ इच्छा पूर्ण करणार)

निवडणूक (Assembly Election) संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.

(हेही वाचा – Raigad जिल्ह्यात ७ पैकी ३ ठिकाणी मविआला शेकापचे आव्हान; महायुतीमध्ये आलबेल)

सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे. दिव्यांगांना निवडणूक (Assembly Election) प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे महत्वाचे असून हे ॲप वापरण्यास अतिशय सोपे आहे. ज्यामुळे दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी नोंदणी करणे, त्याचे मतदान केंद्र शोधणे आणि त्यांचे मत देणे सोपे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्ती व वयोवृद्ध नागरिकांनी सक्षम ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून यामध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा. हे ॲप खऱ्या अर्थाने दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे, यात शंकाच नाही..!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.