Assembly Elections 2023 : निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ५ राज्यांत ‘ते’ ६० लाख मतदार करणार पहिल्यांदाच मतदान

मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी २९००पेक्षा जास्त मतदान केंद्रांचे व्यवस्थापन

94
: बंडोबांना केले जाईल थंड की मैत्रीपूर्ण या गोंडस नावाखाली सर्वकाही सामावून जाईल ?
Assembly Elections 2024 : बंडोबांना केले जाईल थंड की मैत्रीपूर्ण या गोंडस नावाखाली सर्वकाही सामावून जाईल ?

पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीची (Assembly Elections 2023) आज अखेर घोषणा झाली. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी ही निवडणुकीची घोषणा केली. या लोकसभा निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका नवीन मतदान करणारे तरुण उमेदवार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

5 राज्यांच्या निवडणुकीत सुमारे १८ ते १९ वर्षाचे ६० लाख उमेदवार पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे हे पहिलेच मतदान असेल. पात्रता तारखांच्या दुरुस्तीमुळे १५.३९ लाख तरुण मतदार निवडणुकीत भाग घेण्यास पात्र आहेत. तरुण मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी २९००पेक्षा जास्त मतदान केंद्रांचे व्यवस्थापन केले, जाईल अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

(हेही वाचा – Ind vs Aus : भारतीय विजयानंतर माजी खेळाडूंनी केला संघावर कौतुकाचा वर्षाव)

नावनोंदणीसाठी चार वेळा संधी…
यापूर्वी मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांनाच आपलं नाव नोंदवता येत होतं. १ जानेवारीनंतर १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांनाच थेट पुढच्या वर्षीच नोंदणी करावी लागत होती. आता निवडणूक आयोगाने केलेल्या नव्या बदलांनुसार, १ जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण असण्याच्या पात्रतेची आवश्यकता नाही. तरुणांना गेल्यावर्षीपासून १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या तारखांना नोंदणी करता येणं शक्य झालं आहे. त्यामुळे यंदा नवीन उमेदवारांची संख्या ६० लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.