Assembly Elections 2024 : ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा २१५४ मतदारांनी केले टपाली मतदान

35
Assembly Elections 2024 : ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा २१५४ मतदारांनी केले टपाली मतदान
Assembly Elections 2024 : ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा २१५४ मतदारांनी केले टपाली मतदान
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदार अशा एकूण २१५४ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रत्येकाचे मत मोलाचे असून कोणत्याही क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेतर्फे कार्यवाही करण्यात येत आहे. (Assembly Elections 2024)

WhatsApp Image 2024 11 17 at 8.28.59 PM

मुंबई शहर जिल्ह्यात १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृह टपाली मतदान घेण्यात आले. या मतदानासाठी टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. (Assembly Elections 2024)

(हेही वाचा – Navi Mumbai Drugs Case : ५.६२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, २ नायजेरियन नागरिकांना अटक)

कोणत्या मतदार संघात कसे झाले मतदान
धारावी विधानसभा : ८५ वर्षावरील २० मतदार तर ०९ दिव्यांग मतदार
सायन कोळीवाडा विधानसभा : ८५ वर्षावरील २७ मतदार व २४ दिव्यांग मतदार
वडाळा विधानसभा : ८५ वर्षावरील २३४ मतदार व २२ दिव्यांग मतदार
माहीम विधानसभा : ८५ वर्षावरील ५७० मतदार व २३ दिव्यांग मतदार
वरळी विधानसभा ८५ वर्षावरील ११३ मतदार व १९ दिव्यांग मतदार
शिवडी विधानसभा ८५ वर्षावरील २०९ मतदार व ३२ दिव्यांग मतदार
भायखळा विधानसभा ८५ वर्षावरील १६७ मतदार व ३९ दिव्यांग मतदार
मलबार हिल विधानसभा ८५ वर्षावरील २६९ मतदार व १० दिव्यांग मतदार
मुंबादेवी विधानसभा ८५ वर्षावरील १०३ मतदार व ११ दिव्यांग मतदार
कुलाबा विधानसभा ८५ वर्षावरील २४४ मतदार व ०९ दिव्यांग मतदार

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.