Assembly Elections 2024 : शिक्षक मंडळी नाराज; दिवाळीनंतर निवडणुक लागण्याची शक्यता

74
Assembly Elections 2024 : शिक्षक मंडळी नाराज; दिवाळीनंतर निवडणुक लागण्याची शक्यता
Assembly Elections 2024 : शिक्षक मंडळी नाराज; दिवाळीनंतर निवडणुक लागण्याची शक्यता

आगामी विधानसभा निवडणूकीची (Assembly Elections 2024) तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेतेमंडळी सुद्धा प्रचारसभेत व्यस्त आहेत. तर राजकीय वर्तुळात आगामी विधानसभा निवडणुक ही दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी वर्गाला ‘तयार राहा,’ अशा सूचना दिल्या आहेत. यात शालेय शिक्षक (Teacher Election Duty), महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक, इतर अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याने त्यांच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या सुट्यांवर (Diwali Holiday) गदा येण्याची शक्यता आहे. याबाबत शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Assembly Elections 2024 )

(हेही वाचा – Cabinet Meeting : प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान पडणार महागात; ‘या’ शिक्षेची असणार तरतूद)

शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी उन्हाळी आणि दिवाळी सुट्या हक्काच्या मानल्या जातात. उन्हाळी सुट्टीत पेपर तपासण्याचे काम असल्याने अनेकदा शिक्षक व्यग्र असतात. मात्र, दिवाळी सुटीत त्या तुलनेत कामाचा ताण कमी असतो. त्यात यंदा उन्हाळी सुट्यांदरम्यान लोकसभा निवडणूक झाल्याने शिक्षक-प्राध्यापक त्यातही व्यग्र होते. आता ऐन दिवाळीच्या पुढेमागे विधानसभा निवडणुका होत असल्याने पुन्हा एकदा शिक्षक-प्राध्यापक (Teacher-Professor Election Duty), शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी यांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्याची शक्यता आहे. शिक्षकांना या कामी गुंतवण्यापेक्षा सरकारने बेरोजगार सुशिक्षित तरुणांना आणि इतर कर्मचाऱ्यांना काम द्यावे, अशी मागणीही अनेक शिक्षक करीत आहेत. (Assembly Elections 2024 )

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.