Assembly Elections : विधानसभेसाठी भाजपच्या तयारीला सुरुवात; ‘त्या’ आमदारांना इशारा

121
Assembly Elections : फडणवीसांच्या उपस्थितीत BJP ची महत्त्वाची बैठक; 'त्या' आमदारांना इशारा
Assembly Elections : फडणवीसांच्या उपस्थितीत BJP ची महत्त्वाची बैठक; 'त्या' आमदारांना इशारा

आगामी विधानसभाच्या (Assembly Elections) अनुषंगाने राज्यात सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदारांनी केलेली कामे, मिळालेले विजय आदी गोष्टी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) आधी तपासल्या जात आहेत.

भाजपकडून (BJP) दौरे, बैठका घेतल्या जात आहेत. कोकण, मुंबईनंतर ७ ऑगस्ट रोजी भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस सध्या प्रत्येक विभागवार विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : नीरजचा अंतिम सामना कधी होणार?)

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघात भाजपने नेत्यांना चेतावणी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. त्यांनी त्यांची कामगिरी सुधारली नाही, तर तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मुंबईतल्या बैठकीतही काही आमदारांना कामगिरी सुधारण्याची ताकीद दिल्याची चर्चा चालू आहे.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होते चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अनुषंगाने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विभागनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीमध्ये आपल्या विभागात भाजप किती जागा राखू शकेल, किती गमावणार याची चाचपणी सुरू आहे.

विकासकामे करा, निधी कमी पडणार नाही, असे निरोप आमदारांना देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करा, आपल्या भागामध्ये संघटना मजबूत करा, मित्रपक्षांची नाराजी असल्यास दूर करा, स्थानिक पक्ष संघटना यांच्याशी जवळीक साधा. मराठा आरक्षण हे विरोधकांचे पाप असल्याचे लोकांच्या पचनी पाडा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.