- विशेष प्रतिनिधी, मुंबई
आगामी विधानसभा निवडणूक-२०२४ (Assembly Elections) च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर विभागातील वडाळा, शीव (सायन), धारावी, माहीम या मतदारसंघांतील मतदान केंद्रांसंदर्भात करण्यात आलेले नियोजन, पूर्वतयारी आदींचा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी आढावा घेतला. निवडणूक समन्वय अधिकारी फरोघ मुकादम, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे तसेच विविध प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हा आणि उपनगर जिल्हा सध्या निवडणूक पूर्वतयारी सुरू आहे. याच धर्तीवर मुंबई शहर विभागातील पूर्वतयारींचा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी आढावा घेतला. (Assembly Elections)
(हेही वाचा – Cabinet Decision : तीन ऑक्टोबर ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करणार)
मुंबईतील मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आलेले आहे. सर्व मतदार केंद्रांच्या ठिकाणी विविध प्रकारच्या सोयीसुविधा योग्यप्रकारे देण्यासंदर्भात नियोजन करण्यात यावे. मतदारांनी मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी, मतदारसंघात बदल करण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी दिलेल्या अर्जांचा लवकरात लवकर निपटारा करावा. मतदान नोंदणी करणे, मतदानाचा हक्क बजावणे तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. (Assembly Elections)
निवडणुकीसाठी (Assembly Elections) नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे सुसूत्रपणे नियोजन करावे आणि त्यांच्याकडून विहित वेळेत कामे पूर्ण होतील, हे सुनिश्चित करावे, असे निर्देश जोशी यांनी या बैठकीत दिले. तसेच, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सुसूत्रीकरणानंतर मतदान केंद्रांमध्ये झालेल्या बदलांविषयी माहिती द्यावी, मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवाहन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, विविध मतदारसंघांमध्ये कार्यरत निवडणूक अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी तसेच कामकाजाबाबत असलेल्या अडचणी आणि त्यांच्या सूचनाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त जोशी यांनी यावेळी जाणून घेतल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community