जून महिन्याच्या २७ तारखेपासून पावसाळी अधिवेशन चालू झाले आहे. दरम्यान, पाचव्या दिवशी म्हणजचे २ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा (marathi abhijat bhasha) देण्यासंबंधी घोषणा विधानसभेत केली आहे. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. “उघडा डोळे, बघा नीट आणि वागा नीट” सरकार पाडण्यासाठी अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले. मात्र सरकार पडले नाही असे विधान ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Assembly session 2024)
दरम्यान, विधानसभेत (Legislative Assembly 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा केली असून, त्यासाठी सरकार दरबारी काम सुरू आहे. तसेच शिवरायांची वाघनखे देखील लवकरच आणली जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. (Assembly session 2024)
मराठी अभिजात भाषा कशी?
मराठी भाषा सर्वांगसुंदर भाषा असून हिंदुस्थानातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी १५ वी भाषा आहे, तर हिंदुस्थानात तिसरी भाषा आहे. महाराष्ट्राबाहेर पंधरा विद्यापीठांत मराठी भाषा शिकवली जाते. जगातील ५२ देशांत मराठी भाषिक प्रामुख्याने राहत आहेत. मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल आहे. आतापर्यंत तामीळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया अशा सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र मराठीला तो सन्मान अद्यापि मिळालेला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सतत मागणी होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक भाषाप्रेमींनी लोकचळवळ उभारून हा विषय ऐरणीवर आणला जात आहे. (Assembly session 2024)
शिंदेंकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन
मंगळवारी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी शिंदेंनी भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) अभिनंदन केले. सूर्यकुमार यादव याने घेतलेला कॅचचा उल्लेख करत हा कॅच टर्निंग पॉईंट ठरला असे शिंदे म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनाही टोला लगावला. जयंत पाटील तुम्ही वाघांसोबत नाहीत. आम्ही वाघाप्रमाणे काम करणारे आहोत. आमच्यासोबत या असे शिंदे म्हणाले.
उघड डोळे, बघा नीट आणि वागा नीट
तसेच विरोधकांना माझी विनंती आहे. ”उघड डोळे, बघा नीट आणि वागा नीट” असे शिंदे म्हणाले. शिंदेंनी सभागृहात काँग्रेस नेते राहुल गांधींच्या खटाखट विधानाचा उल्लेख केला. यानंतर विरोधकांनी गदारोळ केला. (Assembly session 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community