Assembly Session : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलमधील समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

53
Assembly Session : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलमधील समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलमधील समस्यांचा अभ्यास करून सरकारला अहवाल देण्यासाठी दोन्ही सभागृहांतील पाच सदस्यांची एक समिती नेमली जाईल आणि ही समिती संकुलाची पाहणी करेल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. (Assembly Session)

मुंबई विद्यापीठाच्या न्यू गर्ल्स वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याप्रकरणी भाजपाच्या पराग अळवणी आणि अन्य सदस्यांनी प्रश्न विचारला होता. मुंबई विद्यापीठाचा स्तर आज घसरला आहे. जगातील विद्यापीठे आता भारतात येत आहेत. अशावेळी मुंबई विद्यापीठाचा दर्जा सुधारण्यासाठी काही सर्वंकष विचार होणार आहे का? असा प्रश्न भाजपाच्या आशिष शेलार यांनी केला. (Assembly Session)

(हेही वाचा – वनांचे, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावकऱ्यांच्या सरकार पाठीशी; Sudhir Mungantiwar यांची विधासभेत ग्वाही)

तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वसतिगृहात दूषित पाणी मिळते याची तक्रार मुलींनी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नव्हती. शुद्ध पाणीही मुलींना दिले जात नसेल तर दर्जेदार शिक्षण दूरच राहिले, अशी टीका केली. दूषित पाण्यामुळे मुलींच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास झाल्याची तक्रार करत जीर्ण झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी केली. (Assembly Session)

यावर कलिना संकुलातील सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी नक्कीच पुढाकार घेतला जाईल. या संकुलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून झोपड्या हटविणे प्रस्तावित आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. (Assembly Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.