राज्यातील यंत्रमागांना जाहीर केलेले अतिरिक्त वीजदर सवलत अनुदान १५ मार्च २०२४ पासून मिळणार असून त्यासाठीची ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच भिवंडीमध्ये टोरंट कंपनीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी दुसऱ्या कंपनीला वीज पुरवठ्याचा परवाना देण्याबाबत कायदेशीरबाबी तपासून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. (Assembly Session)
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी गुरुवारी विधानसभेत यंत्रमाग वीज सवलत अनुदान संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना पाटील यांनी २७ अश्वशक्ती जोडभार असणाऱ्या यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपया आणि २७ ते २०१ अश्वशक्ती असणाऱ्या यंत्रमागांना प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज दर सवलत अनुदान १५ मार्च २०२४ रोजी जाहीर केले आहे. त्यासाठी यंत्रमागाच्या नोंदणीची अट ठेवण्यात आली होती. मात्र, आता ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात येत आहे. (Assembly Session)
(हेही वाचा – Chine चे सैन्य भारतीय सीमेवर अनिश्चित काळासाठी तैनात)
भिवंडीत टोरेंट कंपनी बेस्टच्या वीज दरापेक्षा ३५ टक्के महाग वीज पुरवते. त्यामुळे भिवंडीतील यंत्रमागधारकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. भिवंडीतील टोरेंट कंपनीची मक्तेदारी मोडून काढा. या कंपनीचा परवाना येत्या दोन वर्षात संपत असून भिवंडीत इतर कंपन्यांना वीज पुरवठा करण्यास परवानगी द्या, अशी मागणी रईस शेख यांनी यावेळी केली. कायदेशीर बाबी तपासून याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले. (Assembly Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community