लक्षणे नसलेल्या रुग्णांवरील उपचाराचे सीसीसी टू केंद्रे अर्धी रिकामीच! 

सीसीसी टू केंद्रामध्ये दाखल व्हायला कोरोना रुग्ण तयार नसल्याने हे केंद्रे रिकामीच आहेत. हे रुग्ण घरीच उपचार घेतात आणि प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर रुग्णालयात धाव घेतात. 

मुंबईत सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी ७७ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले असून हे सर्व रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. मात्र, यापूर्वी लक्षणे नसलेल्या तथा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना महापालिकेच्यावीने कोविड केअर सेंटर टू अर्थात सीसीसी टूमध्ये दाखल केले जायचे. परंतु आता सीसीसी टूमध्ये दाखल व्हायला रुग्ण तयार नसून परिणामी हे सेंटर आता रिकामीच पहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे हे रुग्ण घरीच उपचार घेताना प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर रुग्णालयात धाव घेतात. त्यामुळे रुग्ण आता आयसीयूअभावी प्राण सोडताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेला होम आयसोलेशन अर्थात हा घरीच राहून उपचार घेण्याच्या पध्दतीत सुधारणा करून सीसीसी टूचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली आहे.

३ हजार ७६६ खाटा या रिक्त आहेत!  

लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना सीसीसी टूमध्ये दाखल करण्यात येते. मुंबईतील सीसीसी टू केंद्रात ८ हजार २११ खाटांची क्षमता आहे. परंतु सध्या या केंद्रांमध्ये केवळ ४,४४५ रुग्णखाटा भरलेल्या आहेत. त्यामुळे ३ हजार ७६६ खाटा या रिक्त आहेत. आतापर्यंत एकूण  ६५ हजार २२३ रुग्णांवर सीसीसी टूमध्ये उपचार करण्यात आला आहे. सीसीसी टूमध्ये घाटकोपर, चेंबूर,  विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम व पूर्व बाजू आणि खार ते सांताक्रुझ  पूर्व आदी भागांमधील रुग्णांना मोठ्यासंख्येने दाखल केले जात आहे.

(हेही वाचा : महापालिका रुग्णालयांत ऑक्सिजन, सर्वसाधारण खाटा रिकाम्या!)

मुंबईमध्ये सध्या ४४ सीसीसी वन केंद्र कार्यरत  

तर मुंबईत बाधित रुग्णाच्या संपर्कातील संशयित रुग्णांचा शोध घेवून त्यांना जोखमीच्या लोकांना सीसीसी वनमध्ये दाखल करण्यात येते. मुंबईमध्ये सध्या ४४ सीसीसी वन केंद्र कार्यरत असून यासर्व ठिकाणी १३ हजार १५ जणांची क्षमता आहे. या सर्व ठिकाणी सध्या ९९३ एवढेच संशयित रुग्ण असून १२ हजार २२ जागा रिकामी आहेत. वरळी, मालाड, विक्रोळी ते भांडुप, माहिम, दादर व धारावी व घाटकोपर आदी भागांमधील सीसीसी वन चांगल्याप्रकारे भरले जात आहेत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here