मुंबईतील पाच प्रमुख पालिका आणि सरकारी रुग्णालयात (Mumbai Government Hospital)दरदिवसाला किमान ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञाच्या मते, अत्यावस्थ अवस्थेतील जे रुग्ण शेवटच्या टप्प्यात खासगी रुग्णालयातून सार्वजनिक रुग्णालयात दाखल होतात, त्यांना वाचावण्यात बरीच आव्हाने येतात. या रुग्णांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले जातात पण बरेचदा अपयश येते, असेही डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले.
मुंबईत राज्य वैद्यकीय शिक्षण विभागातर्गत भायखळा येथे जेजे सरकारी रुग्णालय उभारण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिकेच्यावतीने परळ येथे केईएम रुग्णालय, सायन येथे टिळक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल येथे नायर आणि विलेपार्ले येथे कुपर रुग्णालय पालिकेच्यावतीने सुरु करण्यात आले. मात्र रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षाही रुग्ण दररोज जास्त संख्येने उपचारासाठी येतात, बरेचदा अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना रुग्णांना करावी लागते प्रतीक्षा.
(हेही वाचा : Skills Training for Beggars : आता भिकाऱ्यांना मिळणार कौशल्य विकासाचे धडे)
व्हेंटिलेटरची कमतरता
कित्येकदा रुग्णांना सार्वजनिक रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णाला नजीकच्या खासगी रुग्णालयात नातेवाईक घेऊन जातात. तर खासगी रुग्णालयात उपचार घेऊनही बरेचदा रुग्णाच्या प्रकृतीत फारशी सुधारणा दिसून येत नाही. खासगी रुग्णालयात उपचारासाठी मोठी किंमत मोजताना कित्येकदा नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होते. रुग्णाला उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्यास कित्येकदा डॉक्टरही नातेवाईकांना घरीच उपचार देण्याचा सल्ला देतात. अशावेळी नातेवाईक रुग्णाला सार्वजनिक रुग्णालयात दाखल करतात. रुग्णाला अंतिम क्षणात सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात येते. परिणामी, रुग्णांना वाचवण्यात सार्वजनिक रुग्णालयात अपयश येते.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community