Khadakwasla प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ४.०८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

112
Khadakwasla प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ४.०८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ४.०८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे हे प्रमाण अवघे १४.०१ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत हा पाणीसाठा १.४ टीएमसी इतका कमी आहे. (Khadakwasla)

खडकवासला (Khadakwasla) प्रकल्पात गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला ५.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. गतवर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण १८.७८ टक्के इतके होते. उपलब्ध पाणीसाठ्याची गतवर्षीची आजच्या तारखेची आणि या वर्षीच्या आजच्या तारखेच्या टक्केवारीची तुलना केल्यास, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४.७७ टक्के इतका पाणीसाठा कमी झाला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चार धरणे येतात. या चार धरणांमधील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी इतका आहे. यापैकी सध्या केवळ ४.०८ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. (Khadakwasla)

(हेही वाचा – Monsoon in Mumbai 2024 : मुंबईत बदलतोय मान्सूनचा पॅटर्न; काय म्हणतात हवामान तज्ज्ञ)

पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत. टाटा समूहाची धरणे वगळता उर्वरित २६ धरणे आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे. (Khadakwasla)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.