जल अभियंता विभागाने कशी टाळली मुंबईची पाणी कपात? वाचा…

104

मुंबईतील भायखळा, माझगाव, डोंगरी, पायधुनी आदी भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कपातीचा काळात जल अभियंता विभागाच्या भायखळा परिरक्षण विभागाने २४ तासांत पाच ठिकाणची जलवाहिनी दुरुस्ती, आणि बटरफ्लाय बदलणे अशी कामे पार पाडली. विशेष म्हणजे दोन ठिकाणी जलवाहिनीवर बटर फ्लाय बदलण्याची ही कामे या कपातीच्या काळात करून संभाव्य पाणी कपात टाळण्याचा प्रयत्न करत पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याचे काम केले आहे.

मुंबई महानगरपालिकेतर्फे “ई” व “बी” विभागातील पाणी पुरवठा सुव्यवस्थित होण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै जंक्शन म्हातारपाखाडी तसेच डाॅकयार्ड रोडला असलेली १,४५० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी निष्कासित करण्याची कामे शुक्रवारी, २१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता हाती घेतली होती. ही कामे शनिवारी, २२ जानेवारीला सकाळी १०.०० वाजता पूर्ण झाली. या कामासाठी शहर भागात शुक्रवारी सकाळी १० ते शनिवारी सकाळी १० पर्यंत पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. जल अभियंता खात्याच्या भायखळा परिरक्षण विभागाने हे काम हाती घेऊन एकूण एकाच वेळेस पाच ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची किमया साधली.

(हेही वाचा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अंथरली झाडा-फुलांची भगवी शाल!)

जुनी जलवाहिनी काढून टाकली

भंडारवाडा जलाशयाला पाणी पुरवठा करणारी १,४५० मी. मी व्यासाची जुनी जलवाहिनी तीन ठिकाणी काढून टाकण्यात आली. ही जलवाहिनी काढून टाकण्यात आल्याने भंडारवाडा जलाशयाच्या पाणी पुरवठयात वाढ होणार आहे. त्यामुळे महापलिकेच्या भायखळा इ विभाग आणि डोंगरी बी विभागाच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे.

बटर फ्लाय बदलला

भंडारवाडा जलाशय येथे १,२०० मी.मी व्यासाचा एक बटर फ्लाय व्हॉल्व बसविण्यात आला. यामुळे भविष्यात “ई” विभागातील माउंट रोड परिसरास पाणी पुरवठा करण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच भविष्यात हे काम करण्यासाठी संभाव्य पाणी पुरवठा खंडित करण्याची परिस्थिती टाळता आली आहे.

bmc2

परळ भागातील पाणी कपात टळली

परळ, शिवडी, लालबाग या एफ / दक्षिण विभागात असलेल्या फॉसबरी जलाशयास पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिनीवरील ४५० मी मी व्यासाचा एक नादुरुस्त असलेला बटर फ्लाय व्हॉल्व बदलण्यात आला आहे. या कामासाठी पाणी कपात करावी लागली, परंतु या कपातीचा लाभ उचलत आणि योग्य नियोजन करत महापालिका जल अभियंता विभागाने हे दुरुस्तीचे काम हाती घेत संभाव्य पाणी कपात टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

bmc3

या कामासाठी भायखळा परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता शैलेंद्र सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित देसाई, समीर तडवी, सत्यजित भाटे, प्रदिप बागुल, श्रीराम गाडेकर, जयेश सूर्यवंशी, प्रिया कोल्हे -गुळभिले, मोहिनी सगर यांनी कामगारांमार्फत व कंत्राटदार निशीत ट्रेडर्स यांच्यामार्फत ही सर्वच कामे नियोजित वेळेपूर्वीच यशस्वीपणे पूर्ण केली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.