वरळीच्या कला व हस्तकला वास्तूमध्ये आता प्रकल्पांचे कमांड सेंटर!

वरळीतील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्रामध्ये अस्तित्वात असलेल्या कला व हस्तकला वास्तूचे रुपांतर महापालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी अंतर्गत कामे करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मलनि:सारण प्रकल्प, पर्जन्य जलवाहिनी प्रकल्प व पाणी पुरवठा प्रकल्पांसारख्या मोठे प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली. या सर्व महत्वाच्या प्रकल्पांसाठीचे आता कमांड सेंटर बनवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हे कमांड सेंटर लवग्रोव्ह उदंचन केंद्रातील कला व हस्तकला वास्तूमध्ये बनवण्यात येणार आहे. या वास्तूंचे रुपांतरच आता या प्रकल्पांच्या कमांड सेंटरमध्ये केले जाणार आहे.

सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च!

वरळीतील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्रामध्ये अस्तित्वात असलेल्या कला व हस्तकला वास्तूचे रुपांतर महापालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी अंतर्गत कामे करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदारची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून या कामासाठी देव इंजिनिअर्स ही कंपनी पात्र ठरली आहे. या कमांड सेंटरमधून महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्या विभाग व पाणी प्रकल्प विभागाच्या प्रमुख प्रकल्पांचे नियोजन व नियंत्रण करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या नगर अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यामधून प्रकल्प सल्लागार कर्मचारी व अभियंता वर्ग मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून प्रकल्पांची देखरेख करतील. तसेच नियंत्रण कक्ष प्रकल्प नियंत्रण व देखरेखीकरता व्हिडीओ वॉल, कॉन्फरन्स हॉल अशा अद्यावत सुविधांनी सज्ज असेल. महापालिकेच्या  प्रकल्पांचे नियंत्रण या मध्यवर्ती कक्षातून करणे शक्य होईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा : अखेर स्थायी समितीचे दरवाजे विनोद मिश्रा यांच्यासाठी खुले!)

कमांड सेंटरमध्ये अशी असणार व्यवस्था!

या कामांतर्ग नॉर्थ ब्लॉक व साऊथ ब्लॉक इमारतींच्या पुनर्दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. नार्थ ब्लॉकमध्ये तळमजल्यावर सभागृह, नियंत्रण कक्ष, प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, अतिथी गृह, सुरक्षा चौकी, प्रवेशद्वार व पहिल्या मजल्यावरील दालने, बैठक व्यवस्था, पँट्री, पार्ट टेरेस, महिलांकरता स्वच्छतागृहे व नियंत्रण कक्ष आदींचा समावेश असेल. तर साऊथ ब्लॉक इमारतीतील तळघरातील जिना, कपडे बदलण्याच्या जागा, भंडारगृह, व्यायामशाळा तसेच तळमजला येथील सभागृह, स्वागत कक्ष, कॅफेट एरिया, स्काडा रुम, प्रमुख अभियंता यांची दालने, जीना तसेच पहिल्या मजल्यावर कर्मचाऱ्यांची दालने सभागृह, बैठक व्यवस्था, स्वच्छता गृहे, वर्क स्टेशन आदींचे बांधकाम करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here