Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ होणार का?

Atal Pension Yojana : लाभार्थ्याच्या योगदानावर निवृत्तीवेतनाची रक्कम ठरते.

66
Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ होणार का?
  • ऋजुता लुकतुके

केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) बदल होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यानुसार, सरकार पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार अटल पेन्शन योजनेतून दिल्या जाणाऱ्या पेन्शनच्या वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या अटल पेन्शन योजनेतून १,००० ते ५,००० रुपयांची रक्कम दिली जाते. पेन्शनची रक्कम लाभार्थ्याकडून दिल्या जाणाऱ्या योगदानाच्या रकमेवर आधारित असते.

किमान पेन्शनची रक्कम वाढवून १०,००० रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सरकारची एक अशी पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये गरिबांना आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना निवृत्तीच्या काळात आर्थिक मदत देण्याचा उद्देश सरकारचा आहे. सन २०१५-१६ मध्ये पेन्शन फंड रेगुलटरी अँड डेव्हलपमेंट कडून या योजनेची सुरुवात करण्यात आली. सध्या या योजनेत किमान पेन्शन रक्कम रुपये १०००-५००० रुपये दिले जाते.

(हेही वाचा – Kho-Kho World Cup : पुढचा खो-खो विश्वचषक भारताबाहेर बर्मिंगहॅममध्ये होणार आयोजित)

अटल पेन्शन योजनेचा (Atal Pension Yojana) सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर वारसदाराला पूर्ण पैसे दिले जातात. या योजनेत खाते उघडण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ४० दरम्यान असणे आवश्यक आहे. योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुमच्याकडे एक बँक खातं असणं आवश्यक आहे. तुम्ही नोंदणी अर्ज घेऊ शकता किंवा बँकेच्या वेबसाईट वरुन डाऊनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर पूर्ण अर्ज भरून पेन्शन ऑप्शन निवडा यानंतर आधार कार्ड तर आवश्यक कागदपत्रांचे तो फॉर्म जमा करा.

अर्जदारानं वयाची ६० वर्ष पूर्ण केल्यानंतर संबंधित बँकेला किमान किंवा कमाल मासिक पेन्शन बँक खात्यात जमा करण्यासाठी विनंती अर्ज करावा लागेल. त्यानंतर दरमहा पेन्शनची रक्कम संबंधित खातेदाराला मिळेल. एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास संबंधित रक्कम त्याच्या वारसदारांना मिळेल. जर एखाद्या खातेदाराला पेन्शन योजनेतून वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बाहेर पडायचं असेल तर त्याला त्यानं जमा केलेली रक्कम मिळेल. यासोबत सरकारनं त्या रक्कमेवर मिळवलेलं निव्वळ उत्पन्न दिलं जाईल, याशिवाय खात्याचा मेंटनन्स चार्ज वजा करुन घेतला जाईल. एखाद्या खातेदाराचा ६० वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना म्हणजेच पत्नी किंवा मुलांना ते खातं सुरु ठेवण्याचा पर्याय दिला जातो. दरम्यान, भारतीय पोस्ट किंवा कोणत्याही बँकेतून या योजनेसाठी तुम्हाला खाते उघडावे लागेल. अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) दरमहा, सहामाही किंवा वार्षिक योगदान देता येते. यात योजनेत सहभागी होण्याचं वय, अपेक्षित पेन्शन रक्कम यानुसार योगदान द्यावं लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.