पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, १२ जानेवारी रोजी शिवडी – न्हावा शेवा अटल सागरी सेतूचे (Atal Setu) उदघाटन करण्यात आले. २१.८ किमी लांबीच्या या सागरी सेतूविषयी आता अनेकांना प्रवास करण्याची इच्छा झाली आहे. पण या सेतूवरून प्रवास करताना कोणत्या वाहनाला किती रुपये टोल आहे, याची आधी माहिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
अटल सेतूवर किती आकारला जाणार टोल?
- कार/चारचाकी – चारचाकी वाहनांच्या एकेरी वाहतुकीसाठी २५०, तर दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी ३७५ रुपये इतका टोल आकारण्यात येईल. दैनंदिन पाससाठी ६२५ तर मासिक पाससाठी १२ हजार ५०० रुपये
- मिनीबस – छोट्या बसेससाठी एका बाजूने ४००, तर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी ६०० रुपये टोल आकारला जाईल. दैनंदिन पाससाठी १ हजार तर मासिक पाससाठी २० हजार रुपये.
- छोटे ट्रक/वाहने (२ एक्सेल) – छोट्या ट्रकसाठी एका बाजूच्या वाहतुकीसाठी ८३०, तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १२४५ रुपये इतका टोल आकारला जाईल. दैनंदिन पाससाठी २०७५ तर मासिक पाससाठी ४१ हजार ५०० रुपये.
- एमएव्ही (३ एक्सेल) – या प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीला ९०५ रुपये, तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १३६० रुपये इतका टोल भरावा लागेल. दैनंदिन पाससाठी २२६५ तर मासिक पाससाठी ४५ हजार २५० रुपये.
- मोठे ट्रक/वाहने (४-६ एक्सेल) – या प्रकारच्या वाहनांना एका बाजूने १३०० रुपये, तर दोन्ही बाजूंसाठी १९५० रुपये इतका टोल भरावा लागेल. तर दैनंदिन पाससाठी ३२५० रुपये आणि मासिक पाससाठी ६५ हजार रुपये.
- अवजड वाहने – या श्रेणीतील वाहनांसाठी एका बाजूने १८५० रुपये, तर दोन्ही बाजूंसाठी २३७० रुपये इतका टोल भरावा लागेल. तर दैनंदिन पाससाठी ३९५० रुपये आणि मासिक पाससाठी ७९ हजार रुपये.