पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी ‘अटल सेतू शिवडी-न्हावा शेवा सी लिंक’ सर्व मुंबई नवी मुंबईकरांच्या दृष्टीने महत्वाचा गेल्या अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या पुलाचे उद्घाटन होणार आहे. (Shivdi-Nhava Sheva Sea Link)
या कार्यक्रमाच्या नियोजनसंदर्भात सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थित नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतू सी-लिंकमुळे नवी मुंबई थेट मुंबईशी जोडली जाणार आहे. तर यासाठी २५० रुपये टोल आकरला जाणार असल्याची माहिती ही यावेळी त्यांनी दिली. (Shivdi-Nhava Sheva Sea Link)
(हेही वाचा : TMC : झाडांची माहिती मिळवण्यासाठी उद्यानात लावले क्यू आर कोड ; ठाणे महापालिकेचा उपक्रम)
याचा फायदा नवी मुंबई,ठाणे,पुणे, पालघर अशा सर्वच भागातील गावांचा विकासही झपाट्याने होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई विमानतळ परिसरातील भव्य मैदानात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाल ५० हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या बैठकीला आमदार रविंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना उपस्थितांना दिल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community