Ather Rizta : एथर एनर्जीची नवीन फॅमिली ई-स्कूटर

Ather Rizta : एथऱ कंपनीने आतापर्यंत ४५० सीसी च्या वरच्या ई-बाईकच बनवल्या आहेत

188
Ather Rizta : एथर एनर्जीची नवीन फॅमिली ई-स्कूटर
Ather Rizta : एथर एनर्जीची नवीन फॅमिली ई-स्कूटर
  • ऋजुता लुकतुके

एथर एनर्जी कंपनीने (Ather Rizta) आतापर्यंत ४५० एस आणि ४५० एक्स श्रेणीतील ताकदवान ई-बाईक बनवल्या आहेत. पण, सध्या त्यांनी कौटुंबिक ई-स्कूटर बनवण्यावर लक्ष केंद्रीत केलेलं दिसतंय. कारण, कंपनीची नवीन रिझ्टा ही ई-स्कूटर तिचा लुक, डिझाईन आणि वापरातही अगदी कौटुंबिक स्कूटरसारखी दिसते आहे. या ई-स्कूटरचं (E-scooter) डिझाईन पारंपरिक स्कूटरसारखं आहे. अगदी रंगही स्कूटरमध्ये नियमितपणे दिसणारे आहेत. (Ather Rizta)

(हेही वाचा- Eknath Shinde: अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाला तातडीने मदत करा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

जर लुकमध्ये थोडाफार बदल असले तर तो गाडीच्या नावाच्या पाटीच्या खाली असलेली एलईडी दिव्यांची अख्खी माळ इतकाच आहे. पण, हा बदलही उपयुक्ततेच्या दृष्टीने सुखावणारा आहे. कंपनीने याला एलईडी हायलाईट बार असं म्हटलं आहे. त्याची प्रखरता इतकी आहे की, अंधारात तुम्ही अगदी सहज ही स्कूटर (E-scooter) चालवू शकाल. रिझ्टाचं सगळ्यात खालचं मॉडेल रिझ्टा एस आहे. अगदी या मॉडेलमध्येही ४५० एस मध्ये असलेला एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याला कंपनीने ‘डीपव्ह्यू’ असं नाव दिलं आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी आणि त्या माध्यमातून मोबाईल फोन जोडणीच्या मदतीने संगीत, गुगल मॅप यांचा वापरही करता येईल. (Ather Rizta)

स्कूटरमध्ये स्मार्ट (E-scooter) इको आणि झिप असे दोन मोड आहेत. सुरक्षेच्या बाबतीतही कंपनीने हयगय केलेली नाही. रस्त्यावर पाणी साचलेलं असेल किंवा इतर काही कारणांनी गाडी घसरण्याचा धोका असेल तर एथर रिझ्टाला ते कळतं आणि गाडीच्या चाकांपर्यंत इलेक्ट्रिक संदेश जाऊन गाडी नियंत्रणात आणता येते. अगदी रिझ्टा एसमध्येही मोबाईल चार्जिंग, बॅकरेस्ट, ऑटो होल्ड आणि रिव्हर्स मोड अशा सुविधाही आहेत. (Ather Rizta)

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एथर रिझ्टा गाडीचं इंजिन आणि बॅटरी ही ४५० एस श्रेणीचीच आहे. त्यामुळे या स्कूटरला २२ एनएम पीक टॉर्क आहे. बॅटरी पूर्ण चार्ज व्हायला ८ तास ३० मिनिटं लागतात. पण, पूर्णपणे चार्ज झालेली बॅटरी १२३ किलीपर्यंतचं अंतर कापू शकते. (Ather Rizta)

(हेही वाचा- Madhukar Chavan: उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात; मधुकर चव्हाण यांचा घणाघात)

एथर रिझ्टा एस हे प्राथमिक मॉडेल १ लाख १० हजार रुपयांना उपलब्ध आहे. सगळ्यात वरच्या मॉडेलची किंमत १,४५,००० इतकी आहे. (Ather Rizta)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.