ATM Fee Hike : १ मे पासून बँकेचे आणि एटीएममधून पैसे काढण्याचे ‘हे’ नियम बदलणार

ATM Fee Hike : दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे.

124
ATM Fee Hike : १ मे पासून बँकेचे आणि एटीएममधून पैसे काढण्याचे ‘हे’ नियम बदलणार
  • ऋजुता लुकतुके

नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचेंज शुल्क १७ रुपयांवरुन १९ रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा बदल १ मे २०२५ पासून लागू होणार आहेत. देशांतर्गत वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे. (ATM Fee Hike)

एनपीसीआयने १३ मार्चला जारी केलेल्या पत्रकानुसार गैर वित्तीय व्यवहारांसाठी ७ रुपयांचं इंटरचेंज शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय इंटरचेंज शुल्काव्यतिरिक्त जीएसटी शुल्क देखील आकारलं जाणार आहे. या संदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्ड या हिंदी वेबसाईटनं दिलं आहे. (ATM Fee Hike)

(हेही वाचा – BMC School : मुंबई महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे; सोमवारपासून क्रीडांगणाची स्वच्छता राखली जाणार)

एनपीसीआयने यासंदर्भातील बदल लागू करण्यासाठी आरबीआयकडे मंजुरी मागितली होती. या संबंधात आरबीआयनं ११ मार्च २०२५ ला लिहिलेल्या पत्रात एनपीसीआयला सूचना देण्यात आली होती. त्यामध्ये एटीएम इंटरचेंज शुल्क एटीएम नेटवर्क द्वारे निश्चित केलं जाऊ शकतं, असं सांगण्यात आलं. याशिवाय नव्यानं निश्चित करण्यात आलेलं शुल्क लागू करण्यात येण्यासंदर्भातील तारीख रिझर्व्ह बँकेला एनपीसीआयने कळवावी, असं सांगण्यात आलं आहे. (ATM Fee Hike)

संशोधित इंटरचेंज शुल्क मायक्रो-एटीएम, इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट (कार्ड आधारित आणि यूपीआय आधारित) आणि आंतरराष्ट्रीय एटीएम व्यवहारांवर लागू नसेल. सध्या जे दर आकारले जातात ते कायम असतात. नेपाळ आणि भूतानमध्ये होणाऱ्या व्यवहारांवर शिल्लक तपासणीवर इंटरचेंज शुल्क ७ रुपये निश्चित करण्यात आलं आहे. यावर जीएसटी शुल्क आकारलं जात नाही. (ATM Fee Hike)

(हेही वाचा – Azlan Shah Hockey : प्रतिष्ठेच्या अझलन शाह हॉकी स्पर्धेतून पाकला वगळलं)

एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार सध्या नॅशनल फायनान्शिअल स्विच सदस्यांची संख्या १,३४९ आहे, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये १२९६ इतकी होती. फेब्रुवारी २०२५ मध्ये एनएफएस अनुमोदित व्यवहारांची संख्या ३१.५ कोटी इतकी होती. जी फेब्रुवारी २०२४ मध्ये ३६.५ कोटी होती. यामध्ये वार्षिक आधारावर १३.७ टक्के घसरण झाली. एनएफएस नेटवर्क नुसार एटीएमची संख्या देशभरात २.६५ लाख इतकी आहे. (ATM Fee Hike)

एटीएम कार्ड वापरासंदर्भातील नियम देखील बदलले जाणार आहेत. समजा एखाद्या बँक खातेदारानं त्याचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवरुन पैसे काढले ठरावीक व्यवहारानंतर शुल्क भरावं लागतं. सध्या दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवरुन ५ वेळा मोफत पैसे काढता येतात. आता ही संख्या ३ पर्यंत आणली जाणार आहे. लवकरच हा नियम लागू होईल. (ATM Fee Hike)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.