ATM Money Withdrawal : एटीएममधून पैसे काढणं आता महागणार? रिझर्व्ह बँकेचे नवीन नियम काय सांगतात?

ATM Money Withdrawal : रिझर्व्ह बँक काही नवीन नियमांवर सध्या चर्चा करत आहे.

75
ATM Money Withdrawal : एटीएममधून पैसे काढणं आता महागणार? रिझर्व्ह बँकेचे नवीन नियम काय सांगतात?
  • ऋजुता लुकतुके

एटीएममधून रोख पैसे काढणं काही दिवसांनी तुम्हाला शब्दश: महागात पडू शकतं. कारण, त्यासाठीच्या शुल्कात रिझर्व्ह बँकेकडून वाढ होण्याची शक्यता आहे. एटीएम चालवण्यासाठी बँकेला येत असलेल्या खर्चात अलीकडे वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या एका महिन्यातून पाचवेळा पैसे काढता येतात. तोपर्यंत कुठलंही शुल्क तुमच्याकडून आकारण्यात येत नाही. पण, त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर जे २१ रुपये शुल्क सध्या आकारलं जातं, ते वाढवून २२ रुपये करण्याचा मध्यवर्ती बँकेचा विचार आहे. (ATM Money Withdrawal)

(हेही वाचा – लोकप्रिय क्रिकेट समीक्षक Dwarkanath Sanzgiri यांचे दीर्घ आजाराने निधन)

राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात, एनपीसीआयने याविषयीचा अहवाल तयार केला असून हे शुल्क वाढवण्याची शिफारस केली आहे. बँक तसंच कर्मचारी व ग्राहक युनियन तसंच या विषयातील जाणकारांशी केलेल्या चर्चेनंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार असेल तर हे शुल्क २१ ऐवजी २२ रुपये आकारण्याचा प्रस्ताव आहे. पण, दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरणार असाल तर हे शुल्क १७ रुपयांवरून १९ रुपयांवर जाऊ शकतं. पहिले ५ व्यवहार अजूनही मोफतच असतील. या शुल्काला इंटरचेंज फी असं म्हणतात. (ATM Money Withdrawal)

(हेही वाचा – Mumbai-Goa National Highway च्या पनवेल – इंदापूर टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार)

इंटरचेंज फी एखाद्या खातेदारानं दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकवेळा रक्कम काढल्यास आकारलं जातं.एटीएम सेवा वापरल्यानंतर एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला दिली जाणारी रक्कम आहे. एटीएममधून पैसे काढल्यानंतरच्या बिलावर देखील त्याचा उल्लेख असतो. शहरी भागात वाढीव शुल्क आकारणीला विरोध होण्याची शक्यता नाही. पण, ग्रामीण व निम-शहरी भागातील ग्राहकांची यामुळे गैरसोय होऊ नये यावर अजूनही एनपीसीआय विचार करत आहे. त्यामुळे हा निर्णय अजून मध्यवर्ती बँकेनं जारी केलेला नाही. मेट्रो भागातील दर वाढवून इतर भागांमध्ये ते जैसे थे ठेवण्याचा आणखी एक पर्याय त्यांच्याकडे असेल. एनपीसीआयच्या अहवालानुसार, वाढती महागाई आणि गेल्या दोन वर्षातील वाहतुकीचा वाढता खर्च, रोख रकमेची प्रतिपूर्ती आणि इतर कारणांमुळे मेट्रो शहरांच्या बाहेर आणि ग्रामीण भागात एटीएम चालवण्याचा खर्च वाढत आहे. त्यामुळेच बँकांना एटीएम शुल्कात वाढ करून हवी आहे. (ATM Money Withdrawal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.