ATM Shutting Down ? बँका आपली एटीएम केंद्र का बंद करत आहेत?

ATM Shutting Down ? देशभरात आर्थिक देवाणघेवाण वाढलेली असताना एटीएम केंद्र का बंद होत आहेत?

174
ATM Shutting Down ? बँका आपली एटीएम केंद्र का बंद करत आहेत?
  • ऋजुता लुकतुके

देशात रोखीने होणारे व्यवहार वाढत असताना आणि आर्थिक देवाणघेवाणही वाढलेली असताना अनेक बँका एटीएम केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करताना दिसत आहेत. यामागील कारण आहे देशात कोरोना काळापासून झालेली डिजिटल क्रांती. एटीएममधून रोख नोटा काढून घेण्यापेक्षा लोकांचा कल आता युपीआयच्या वापराकडे अधिक आहे. ऑनलाईन व्यवहार आणि युपीआयच्या वाढत्या वापरामुळे एटीएम केंद्रांची उपयुक्तता आता कमी झाली आहे. द इकॉनॉमिक टाईम्सने यावरील एक अहवाल तयार केला आहे आणि त्यातून ही माहिती समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या शिरपेचातील हा एक मानाचा तुरा समजावा लागेल. कारण, युपीआय किंवा युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही भारताने विकसित केलेली प्रणाली आहे आणि भारताबाहेर आफ्रिकन आणि आशियाई देशांतही त्याचा प्रसार आता झाला आहे. (ATM Shutting Down ?)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे शपथविधीपूर्वी देव दर्शन आणि गो दर्शन!)

रिझर्व्ह बँकेनं अलीकडे जारी केलेल्या नवीन आकडेवारीत सप्टेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीचा अभ्यास करण्यात आला आहे आणि त्यानुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये २,१९,००० इतकी एटीएम केंद्र देशात होती. ती संख्या आता ८७,६३८ वर आली आहे. हा बदल युपीआयमुळेच घडून आल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. ‘भारतीय बँक क्षेत्र आता बदलतंय. बँकिंग सेवांचा विस्तार, डिजिटायझेशन आणि आधीपर्यंत बँकिंग सेवा न पोहोचलेल्या क्षेत्रांमध्ये विस्तार असं हे नवीन चित्र आहे. मोबाईलचा वापर आणि इंटरनेटची उपलब्धता यामुळे युपीआयने बँकिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे आणि हे क्षेत्र सतत बदलत राहणार आहे,’ असं एजीएस टेक्नोलॉजीसचे अध्यक्ष रवी गोयल यांनी म्हटलं आहे. (ATM Shutting Down ?)

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis : मुंबईत घर नाही, एकही कार नावावर नाही असा मुख्यमंत्री.. किती आहे संपत्ती ?)

भारतीय अर्थव्यवस्थेत अजूनही रोखीने होणारे व्यवहारच जास्त आहेत आणि आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत एकूण देवाणघेवाणीपैकी तब्बल ८९ टक्के व्यवहार हे रोखीने झालेले आहेत. देशाच्या जीडीपीतील १२ टक्के व्यवहार हे रोखीने झालेले आहेत. पण, एटीएमची संख्या आता कमी होतेय आणि ऑनलाईन व्यवहारांमध्ये युपीआय वापराचं प्रमाण वाढतं आहे. सध्या देशात १,००,००० लोकांमागे १५ एटीएम केंद्र आहेत आणि हे प्रमाण येत्या वर्षांत आणखी कमी म्हणजे लाखामागे २ इतकं होऊ शकतं. एटीएमचा मोफत वापर आणि किती पैसे एकाच वेळी काढता येतील यावर रिझर्व्ह बँकेनं घातलेले निर्बंध हे एटीएम वापर कमी होण्यामागील आणखी एक कारण आहे. (ATM Shutting Down ?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.