बहुसंख्य हिंदू असलेल्या क्षेत्रांमध्येही आता हिंदूंच्या धर्मगुरूंवर वारंवार हल्ले होण्याच्या घटना अत्यंत वेदनादायी आहेत. शासनाने याबद्दल कठोर कारवाई करून ही प्रवृत्ती मोडून काढणे आवश्यक आहे. पालघर प्रकरणात अजूनही दोषींना शिक्षा झालेली नाही, हे हिंदू समाज विसरलेला नाही. सरकार हिंदूंच्या धर्मगुरूंचे रक्षण करण्यासाठी असमर्थ असेल, तर आता हिंदूंनीच हिंदु धर्म आणि धर्मगुरु यांचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले आहे. नाशिक येथील डॉ अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
(हेही वाचा – Manonmanyam Sundaram Pillai : तमिळनाडूचे राज्यगीत कोणी रचले ठाऊक आहे का ?)
राज्य शासनाकडे पोलीस संरक्षण देण्याची मागणी
‘अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज’चे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पिठाधीश्वर डॉ अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर बुधवार, ३ मार्चला रात्री १ वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समाजाच्या जमावाने नाशिक हायवेजवळ हल्ला करून त्यांच्या गाडीचे नुकसान केले. अनिकेतशास्त्री महाराज यांनी यासंदर्भात नाशिकच्या (Nashik) उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून राज्य शासनाकडे पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हा त्यांच्यावर झालेला चौथा हल्ला असल्याचा दावा अनिकेतशास्त्री महाराज यांनी केला आहे.
पालघर साधू हत्याकांडसारखाच नाशिक रोड येथे करण्याचा प्रयत्न झाल्याची भीती अनिकेतशास्त्री महाराज यांनी व्यक्त केली. चार वर्षांपूर्वी १६ एप्रिल २०२० या दिवशी पालघर येथे जमावाकडून झालेल्या मारहाणीत २ साधू यांच्यासह अन्य तिघांचा प्राण गेला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community