बांगलादेशमध्ये (Bangladesh) पुन्हा एकदा एका हिंदू (Hindu) मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. तसेच मंदिरातील देवतांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. ही घटना सिराजगंजच्या (Sirajganj) काजीपूर (Kajipur) उपजिल्हा येथे घडली. दि. १ मार्च रोजी येथील सोनामुखी बाजारात असलेल्या ‘शिखा स्मृती सर्वजन दुर्गा मंदिर’मध्ये काही लोकांनी तोडफोड केली. या मंदिराचे काळजीवाहक जतिन कर्मकार (Jatin Karkar) यांनी सांगितले की, कोणीतरी बाहेरून मंदिराच्या आत बॉम्ब फेकला आणि मूर्ती फोडली.
( हेही वाचा : dudhsagar falls trek : दूधसागर धबधबा पाहायचा असेल किती वेळ ट्रेकिंग करावी लागते?)
जतिन कर्मकार (Jatin Karkar) म्हणतात, “दर रविवारी सकाळी मी मंदिरात पूजा करण्यासाठी जातो. यावेळी मी तिथे गेलो तेव्हा मला दिसले की मूर्ती तुटलेली आहे. या काँक्रीट मंदिरासमोर स्टेनलेस स्टीलचे कुंपण आहे. बाहेरून कोणीतरी मंदिराच्या आत बॉम्ब ठेवला आणि मूर्ती फोडून जमिनीवर फेकली. प्रशासनाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.” या घटनेत सहभागी असलेल्यांना लवकरात लवकर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दि. २ मार्च रोजी सकाळी स्थानिक माध्यमांना ही माहिती मिळाली. त्यानंतर काजीपूर उपजिल्हा कार्यकारी अधिकारी (EO) दिवाण अकरमुल हक आणि काजीपूर पोलिस स्टेशनच्या (Kazipur Police Station) ओसी नूरी आलम (OC Noori Alam) यांनी घटनास्थळी भेट दिली. नूरी आलम म्हणाल्या, “घटनेच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी मंदिरातील पवित्र मूर्तीचे नुकसान झाले. सहभागी असलेल्यांची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे.”
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community