Baloch Liberation Army attack : बलुचिस्तानमध्ये पाकचा राष्ट्रध्वज विकणार्‍या दुकानावर आक्रमण; ३ जण ठार

190
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १३ ऑगस्ट रोजी क्वेट्टा शहरात झालेल्या बाँबस्फोटात ३ जण ठार, तर ६ जण जखमी झाले. या स्फोटाची जबाबदारी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने (Baloch Liberation Army attack) घेतली. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील लियाकत बाजारात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज विकणार्‍या दुकानदारावर ग्रेनेड फेकण्यात आले.
या घटनेनंतर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने (Baloch Liberation Army attack) म्हटले की, आम्ही परिसरातील दुकानदारांना पाकिस्तानचे झेंडे विकण्यास प्रतिबंध केला होता. ज्या दुकानदारांनी ऐकले नाही, त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानमध्ये १४ ऑगस्टला ७८वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने लोकांना १४ ऑगस्ट या दिवशी सुटी साजरी करू नये, असे सांगितले होते. अलीकडच्या काळात बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी होणार्‍या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राष्ट्रध्वज विकणार्‍या दुकानांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांना राष्ट्रध्वज विकण्याचा व्यवसाय सोडावा लागला आहे. वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये अशा घटना घडल्या, ज्यात पाकिस्तानचे झेंडे विकणार्‍या लोकांवर हल्ले झाले. बलुचिस्तानमधील (Baloch Liberation Army attack) अनेक लोकांना भारताच्या फाळणीनंतर स्वतंत्र देश म्हणून जगायचे होते. मात्र त्यांच्या संमतीविनाच त्यांचा पाकिस्तानात समावेश करण्यात आला. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये सैन्य आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.