अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर रामभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून भगवान श्रीरामाच्या भक्तांची अयोध्येकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने विविध शहरांना अयोध्येच्या पवित्र स्थळाशी जोडण्यासाठी आस्था विशेष गाड्यांची (Ayodhya Train) मालिका सुरू केली आहे.
(हेही वाचा Vasant More यांचे WhatsApp स्टेटस चर्चेत; लोकसभेच्या उमेदवारीसाठी थेट पक्ष नेतृत्वाला दिला इशारा)
रात्री आठ वाजता घडली घटना
श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये (Ayodhya Train) ६ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसमाने जळता मोबाईल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञाताने जळता मोबाईल ट्रेनच्या खिडकीतून आत फेकल्याने एक महिला प्रवासी जखमी झाली. या घटनेने रेल्वे बोगीतल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. ही घटना मंगळवारी चिंचवड ते देहू रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान घटली. आस्था स्पेशन ट्रेन (Ayodhya Train) पनवेल स्थानकात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी बोगीत धाव घेत जळत्या मोबाईलसह इतर सामान जप्त केले.
Join Our WhatsApp Community