Khalapur मध्ये धर्मांध मुसलमानांचा गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला; सहा आरोपींना अटक, इतरांचा शोध सुरू

82
Khalapur मध्ये धर्मांध मुसलमानांचा गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला; सहा आरोपींना अटक, इतरांचा शोध सुरू
Khalapur मध्ये धर्मांध मुसलमानांचा गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला; सहा आरोपींना अटक, इतरांचा शोध सुरू

खालापूर (Khalapur) तालुक्यातील मौजे हाळ येथे गोरक्षकांवर इस्लामिक कट्टरपंथींच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला आहे. दि. १३ मार्च रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास ही घटना घडली. मौजे हाळ या मुस्लिमबहुल गावात १०० ते १५० कट्टरपंथींनी हातात लाकडी दांडके व दगड घेऊन गोरक्षकांवर आणि पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. यात काही महिला आणि अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. सुदैवाने गोरक्षक आणि पोलीस जमावाच्या तावडीतून सुटले, त्यानंतर कट्टरपंथी जमावाने नजीकच्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Pune National Highway) ये जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. याप्रकरणी ६० ते ७० जणांविरोधात खालापूर पोलीस स्थानकात (Khalapur Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : Maruti Baleno 2025 : मारुती बलेनोचा नवीन अवतार बलेनो २०२५ ची भारतीय बाजारपेठेत हवा

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, युकेज् रिसॉर्ट जवळील शेतातून एका टेम्पोमध्ये दोन बैल भरून ते हाळ गावामध्ये घेऊन जात असताना गोरक्षकांनी गोतस्करांना पकडले. त्याबाबत खालापूर (Khalapur) पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळात एका शेतामध्ये काही लोकांच्या हालचालीबाबत गोरक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलीसांची मदत मागितली. त्यानंतर गोरक्षकांनी पुढे शेतामध्ये शोध घेतला असता दोन बैल व एक गाय असे झुडपामध्ये बांधून ठेवलेले प्राणी बसले. तसेच एक बैल पडीक खोलीमध्ये बांधुन ठेवलेला होता. त्यासोबतच एका खड्ड्यामध्ये जनावरांची कत्तल करून त्या जनावरांचे मांस, कातडी, शिंगे टाकलेले आढळले. त्यामुळे बांधून ठेवलेले बैल, गाय कत्तलीसाठी आणल्याचे गोरक्षकांच्या लक्षात आले. (Khalapur)

दरम्यान गोरक्षकांनी पोलीसांची मदत घेऊन गोतस्करांना अटक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावातील कट्टरपंथी जमावाने पोलीस आणि गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अनेक गोरक्षक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्या जमावामध्ये समीर सय्यद (Sameer Syed), मुर्तुजा मेटकर (Murtuja Metkar), जावेद लियाकत सोंडे, कादीर लतीफ कर्जीकर, रियाज जळगावकर, उस्मान जळगावकर, समीर दुस्ते, मुजफ्फर कर्जीकर, मोज्जम मांडलेकर, मुजीब जळगावकर, आसिफ बेडेकर व इतर असे सामील होते. (Khalapur)

या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०९, १३२, १२१ (१), ११८ (१), १८९, १८९ (२), १८९(३), १८९ (४), १८९ (५), १९०, १९१(१) यासह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (Maharashtra Animal Preservation Act, 1976.) (सुधारणा अधिनियम २०१५) चे कलम ५,९,११ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ६ लोकांना पोलीसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.