Holi ला धर्मांधांनी केला हिंदूंवर हल्ला; अमित मालवीय म्हणाले, पश्चिम बंगालचा बांगलादेश…

48
Holi ला धर्मांधांनी केला हिंदूंवर हल्ला; अमित मालवीय म्हणाले, पश्चिम बंगालचा बांगलादेश...
Holi ला धर्मांधांनी केला हिंदूंवर हल्ला; अमित मालवीय म्हणाले, पश्चिम बंगालचा बांगलादेश...

पश्चिम बंगालमधील (West Bengal) बीरभूम जिल्ह्यात होळीच्या (Holi ) दिवशी इस्लामिक कट्टरपंथींनी हिंदूंवर (Hindu) हल्ला केला आहे. बीरभूमच्या अनैपूर गावात दि. १४ मार्च रोजी ही घटना घडली. डोल पौर्णिमा आणि होळी साजरी करणाऱ्या हिंदूंवर पोलिसांसमोर हल्ला करण्यात आला. त्यामुळे हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अमित मालवीय (Amit Malviya) यांनी यासंदर्भात ट्विट करत हे प्रकरण उघडकीस आणले.

( हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलच्या दहाही फ्रँचाईजींचे कर्णधार अखेर ठरले; ५ कर्णधार नव्या दमाचे

अमित मालवीय (Amit Malviya) म्हणाले की, ममता बॅनर्जींच्या ( Mamata Banerjee) राजवटीत पश्चिम बंगाल (West Bengal) हळूहळू बांगलादेशासारखे होत आहे. होळी (Holi) साजरी करणाऱ्या हिंदूंवर (Hindu) झालेला हल्ला टीएमसीच्या पंचायत सदस्याने केला आहे. हिंदूंनी (Hindu) जय श्रीरामचा जयघोष केल्याप्रकरणी धर्मांधांनी हिंदूंना (Hindu)लक्ष्य केल्याचे व्हिडिओतून स्पष्टपणे दिसत आहे. हिंदूंना हिंसाचारापासून वाचवण्याऐवजी पोलिसांनी हल्लेखोरांना वाचवल्याचा आरोपही अमित मालवीय (Amit Malviya) यांनी केला.

या हल्ल्यानंतर बीरभूम (Birbhum) जिल्हा प्रशासनाने सायंथिया शहराजवळील पाच ग्रामपंचायतींमध्ये दि. १७ मार्चपर्यंत इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अफवा आणि बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी सैंथिया शहरातील किमान ५ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस-ओव्हर-इंटरनेट टेलिफोन सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सतत हल्ले होत असल्याचा आरोप भाजप नेते अमित मालवीय (Amit Malviya) यांनी केला आहे.

नंदीग्राम ब्लॉक 2 मधील अहमदाबाद (Ahmedabad) परिसरातील कमालपूर येथील स्थानिक रहिवासी गेल्या काही दिवसांपासून नमाज अदा करत होते. जेव्हा पूजा आणि राम नारायण कीर्तन अखंडपणे सुरू होते. तेव्हा काही धर्मांधांनी श्री रामाच्या नावाचा जप सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी तेथे तोडफोड करून मूर्तींची विटंबना केली.बरुईपूर, जाधवपूर आणि मुर्शिदाबादसह राज्यभर अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी बंगालच्या (West Bengal) काही भागात होळी (डोल पौर्णिमा) साजरे करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. या कठीण काळात भाजप बंगाल त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. आम्ही ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) पश्चिम बंगालला दुसरे बांगलादेश बनवू देणार नाही, असा इशारा मालवीय (Amit Malviya) यांनी दिला. (Holi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.